पॅनेक्स २०२१ मध्ये भारतीय उद्योगांद्वारे भविष्यातील महामारीसारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपकरणांच्या क्षमतेचे प्रदर्शन देखील समाविष्ट होते.
पुणे - मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण सराव ‘पॅनेक्स २१’ (Panex 21) नुकताच पुण्यात (Pune) संपन्न झाला. तीन दिवसांच्या या सरावात बिमस्टेक देशांतील वरिष्ठ अधिकारी, सरकारी अधिकारी आणि विषय तज्ञांनी सहभाग घेतला होता. तर समारोपादरम्यान आपत्ती निवारण करताना समोरील आव्हाने, आणि उपाययोजनांशी संबंधित विविध पैलूंवर आपत्ती सज्जता चर्चा (टेबल टॉप एक्सरसाईज) आयोजित करण्यात आले. (panex 21 celebrate in pune)
पॅनेक्स २०२१ मध्ये भारतीय उद्योगांद्वारे भविष्यातील महामारीसारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपकरणांच्या क्षमतेचे प्रदर्शन देखील समाविष्ट होते. आपत्कालीन बचाव कार्य करताना भारताने मिळवलेले कौशल्य या सरावात दाखविण्यात आले. यामध्ये पूर्व सूचना, रिमोटली पायलटेड वाहनांद्वारे (आरपीव्ही) टेहळणी, मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही), आपत्तीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण सॉफ्टवेअर, संसाधन व्यवस्थापन सॉफ्टवेअर्स, कमांड कंट्रोल सेंटर्सची स्थापना आदींचा समावेश होता.
आपत्ती सज्जता चर्चेदरम्यान, व्यवसाय संघामध्ये विभागलेल्या सर्व प्रतिनिधींमार्फत आपत्कालीन परिस्थितींवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक संघाने संयुक्त मानवतावादी साहाय्य आणि आपत्ती निवारण कार्यान्वयनाची कार्यपद्धती, महामारीच्या परिस्थितीत कार्य करण्यासाठी नियमावली आणि अशा क्रिया करण्यासाठी तंत्रज्ञान आणि उपलब्ध संसाधने सादर केली.
आपत्ती सज्जता चर्चेदरम्यान प्रादेशिक आंतरराष्ट्रीय प्रतिसाद यंत्रणा विकसित करण्यासाठी लष्कर-ते-लष्कर सहकार्याकरिता नियमावली विकसित करणे आवश्यक असल्याचे सर्व प्रतिनिधींनी सुचविले. यावेळी सर्व सहभागींना संबोधित करताना, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी आपत्तींच्या आव्हानांवर मात करण्यासाठी बिमस्टेक राष्ट्रांमधील सहकार्यासाठी आराखडा, माहितीची देवाणघेवाण यंत्रणा आणि नियमावलीची आवश्यकता स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.