पानशेत धरणातून १८ हजार ७८४ क्युसेकचा विसर्ग

पानशेत धरणातून पाणी सोडण्यास सुरवात केली आहे.
पानशेत धरण
पानशेत धरणsakal
Updated on

खडकवासला : पुणे रायगड जिल्ह्यालगतच्या पट्ट्यात गुरुवारी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने पानशेत धरण आज गुरुवारी सकाळी सात वाजता १०० टक्के भरले. पानशेत धरणातून पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. सव्वा दहा वाजता १८ हजार ७८४ क्युसेकचा विसर्ग अंबी नदीत सोडला आहे.

पानशेत, वरसगाव धरणाच्या शेवटच्या टोकाला रायगड जिल्ह्याची हद्द आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता मागील २४ तासातील पाऊस खडकवासला २८, पानशेत ८७, वरसगाव ८९ व टेमघरला १७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सकाळी ११ वाजताची धरण स्थिती

खडकवासला ८२.७६ टक्के ,

पानशेत १०० टक्के,

वरसगाव ९२.६० टक्के

टेमघरला ७६.७६ टक्के

पानशेत धरणाचा मंगळवार पासूनचा प्रवास

-मंगळवारी सायंकाळी पाच वाजता ८९.५४ टक्के भरले होत.

-बुधवारी सकाळी पाच वाजता ९२.७८ टक्के

-बुधवारी सायंकाळी पाच वाजता ९६.३१ टक्के

-बुधवारी सायंकाळी पाच वाजता ९६.३१ टक्के

-मध्यरात्री १२ वाजता ९९.१३ टक्के

-मध्यरात्री १२ वाजता ६८३ क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रामध्ये सोडले

-गुरुवारी पहाटे ५:३० वाजता नदीपात्रामधील ६८६ क्यूसेक्स विसर्ग बंद केला.

-गुरुवारी पहाटे रायगड जिल्ह्यालगत पावसाची मुसळधार पाऊस सुरू झाला

-त्याचा परिणाम सकाळी सात वाजता जाणवला.

-गुरुवारी सकाळी सहा वाजता ९८.३८ टक्के.

सकाळी सात वाजता १००% भरले

-धरणाच्या सांडव्यावरून सकाळी सात वाजता ९७७ क्यूसेक पाणी सोडले

-०८:०० वा.१९८० क्यूसेक

-०८:३० वा. ३९०८ क्यूसेक

- ०९:०० वा. ७ हजार ३७६ क्यूसेक

-सकाळी ०९:३० वा. १२ हजार ९३६ क्यूसेक

-सकाळी १०:१५ वा. १८ हजार ७८४ क्यूसेक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()