पुणे : राज्यातील आरोग्य विभाग, म्हाडा पाठोपाठ शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) पेपर फुटी प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. आता संबंधित परीक्षांसह विविध प्रकारच्या ऑनलाईन परीक्षांचे पेपर फोडण्यासाठीचे प्रशिक्षण थेट बिहारमधील पाटना येथे मिळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेषतः टीईटीमध्ये आढळलेल्या आरोपींनी अशा प्रकारचे पेपरफुटीचे प्रशिक्षण घेतले आहे काय ? याचा तपास सायबर पोलिसांकडून आत केला जात आहे.
आरोग्य सेवेच्या पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यातील म्हाडा व "टीईटी' पेपरफुटीची प्रकरणे पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बाहेर काढली. त्यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण विभागासह जी.ए.सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली. तसेच सगळ्याच परीक्षा प्रकरणात सुरुवातीपासूनच सक्रीय असलेल्या दलालांचे मोठे जाळेही पोलिसांनी खणून काढत त्यांना अटक केली. पेपरफुटी कशी केली जात होती, त्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जात होता, याचा तपास सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
बिहारमध्ये पेपर फोडण्यासाठीची प्रशिक्षण केंद्रे?
सायबर पोलिसांकडून अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली जात आहे. त्यातच विविध प्रकारच्या परीक्षांचे पेपर फोडण्यासाठी बिहारमधील पाटना येथे खास प्रशिक्षण केंद्र असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित ठिकाणांहूनच आरोग्य सेवा, "टीईटी'मधील आरोपींनी प्रशिक्षण घेतले आहे काय ? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. सायबर पोलिसांनी अटक केलेल्या दलालांचे देशभर जाळे असून त्यांच्याकडूनच देशातील विविध परीक्षांचे पेपर फोडण्याच्या प्रकरणांशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रोग्रॅमींग कोड "ब्रेक' करून, लॅन कनेक्शन काढून होते पेपरफुटी
राज्य सरकारच्या विविध विभागांनी जी.ए.सॉप्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीकडे आरोग्य, म्हाडा, टीईटीसह विविध प्रकारच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपविली होती. त्याच पद्धतीने राज्य सरकार त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या परीक्षा पुर्णपणे पार पाडण्यासाठीची जबाबदारी ठराविक एजन्सीकडे देतात. अशा खासगी एजन्सीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन परीक्षांमध्ये गैरव्यवहार केला जात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. संबंधीत खासगी एजन्सी त्यांना मिळालेल्या प्रश्नपत्रिका काही तास आगोदरच प्रश्नपत्रिका कॉम्पुटर सर्व्हरवर अपलोड करतात. नेमकी हिच संधी साधून पेपर फोडणाऱ्यांच्या टिम संबंधीत ऑनलाईन परीक्षेसाठीचा "प्रोग्रॅमिंक कोड' फोडून प्रश्नपत्रिका बाहेर काढतात. तसेच परिक्षा केंद्रावरील कॉम्पुटरमध्येही छेडछाड करुन तसेच काही वेळेसाठी कॉम्पुटरचे लॅन कनेक्शन काढून पेपरफुटी केली जातात. विशेषतः संबंधीत खासगी एजन्सी, परीक्षा केंद्र मालक यांच्याशी संगनमत करुन 'सेंट्रल कमांड कोड' बदलून ठरावीक बैठक क्रमांकाच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरे बदलली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.