पारगाव - दीपावली पाडव्याच्या निमित्ताने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पोंदेवाडी गावातील नव्वदी पार केलेल्या बुजुर्ग आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणाऱ्या जेष्ठांना शेजारी बसवून घेत संवाद साधला आस्थेवाईक विचारपूस करत त्यांचा सन्मान केल्याने संपूर्ण गावकरी भाराहून गेले.
दीपावली पाडव्याच्या औचित्य साधून पोंदेवाडीचे माजी सरपंच नाथा दादा पोखरकर, माजी सरपंच वसंतराव रोडे, सदाशिव रोडे, नारायण कोंडीबा पोखरकर , शंकर रामभाऊ रोडे, पिराजी अतू पोखरकर ,विठ्ठल मखर, आनंदराव पोंदे, सदाशिव पडवळ या जेष्ठांनबरोबर आत्ताच्या पिढीतील खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, सरपंच निलम वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर, संदीप पोखरकर, अमोल वाळुंज, सोमनाथ वाळुंज, निलेश पडवळ आदी ग्रामस्थांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पारगाव येथील भीमाशंकर साखर कारखाना येथे भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री. वळसे पाटील यांनी वयाची नव्वदी पार केलेल्या व जन्मजात दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असलेले नारायण कोंडीबा पोखरकर यांना डाव्या बाजूला तर सलग पंधरा वर्षे बिनविरोध सरपंच राहिलेले नाथा दादा पोखरकर यांना उजव्या बाजूला बसून घेतले. त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा सन्मान केला. यावेळी नाथा दादा पोखरकर यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत १९८० दरम्यानची एक घटना सांगितली.
शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना पारगाव वरून शिरूर जात असताना पोंदेवाडी ग्रामस्थांनी रस्त्यात शरद पवार यांना अडवून गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर असलेला सिंचन योजनेच्या कर्जाचा बोजा कमी करण्याची विनंती केली. त्यावेळी माजी आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ,दत्तात्रेय सावित्राजी रोडे पाटील, बाबुराव गेनुजी ढोबळे हेही उपस्थित होते.
त्यानंतर आठवड्याच्या आतच शरद पवार यांनी पोंदेवाडी गावावर असणार मोठं कर्ज कशा पद्धतीने माफ केलं याचे जुने किस्से दिलीप वळसे पाटील यांना सांगितले शिवाय गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मागणीनुसार गावातील माऊली मंदिर परिसर सुधारण्यासाठी लगेचच वीस लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन देऊन गावाला दिवाळी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.