डेक्कन क्वीनच्या ‘व्हिस्टाडोम कोचवर प्रवाशाची नाराजी

डेक्कन क्वीनला जोडण्यात आलेला ‘व्हिस्टाडोम कोचच्या आकर्षणामुळे दुप्पट भाडे भरले. हा कोच इंजिनानंतर पहिलाच लावल्याने १८० अंशात व्ह्यू दिसत नाही.
Vistadom coach
Vistadom coachSakal
Updated on
Summary

डेक्कन क्वीनला जोडण्यात आलेला ‘व्हिस्टाडोम कोचच्या आकर्षणामुळे दुप्पट भाडे भरले. हा कोच इंजिनानंतर पहिलाच लावल्याने १८० अंशात व्ह्यू दिसत नाही.

पुणे - डेक्कन क्वीनला (Deccan Queen) जोडण्यात आलेला ‘व्हिस्टाडोम कोचच्या (Vistadome Coach) आकर्षणामुळे दुप्पट भाडे (Double Rent) भरले. हा कोच इंजिनानंतर पहिलाच लावल्याने १८० अंशात व्ह्यू दिसत नाही. या डब्यापर्यंत सामानासह पोहोचण्यास ज्येष्ठ नागरिकांना १५ ते २० मिनीटे लागतात. डायनिंग कार या कोचला जोडलेली नाही. कोच मधील आर्कषक दिव्यामुळे प्रदूषण होत आहे, असे वाटले. तसेच प्रवास सुरक्षित वाटला नाही. असा अनुभव ज्येष्ठ प्रवासी प्रदीप दीक्षित यांना सोमवारी मुंबई- पुणे प्रवासादरम्यान आला. त्यामुळे त्यांनी ‘व्हिस्टाडोम’ कोचवर नाराजी दर्शविली.

Vistadom coach
कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ५२ व्या तुकडीचा दिक्षान्त सोहळा उत्साहात संपन्न

मुंबईपासून कर्जत येई पर्यंत भुकेची, तहानेची मारामार झाली. त्यानंतर चहा, नाष्टा मिळाला तर तो डब्यापर्यंत पोहोचेपर्यंत थंड झालेला होता. तसेच रेल्वेच्याच एका मद्यधुंद सेवकाने कोचमध्ये प्रवेश केला. यामुळे असुरक्षितेतची भावना निर्माण झाली. त्याच्यामुळे सोबत असलेले साहित्य मांडीवर घेऊन बसावे लागले. नेहमी पहिल्या प्लॅट फॉर्मवर येणारी ही क्वीन चक्क पाचव्या क्रमांकाच्या प्लॅट फॉर्मवर आली. पुण्यातील रेल्वे स्थानकावरील सरकते जिने बंद होते. कोरोनाकाळ सुरु झाल्यापासून दोन वर्षानंतरचा हा पहिला प्रवास होता. असा अनुभव आल्याने या गाडीने ‘अंतिम प्रवास’ समजावा का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असे दीक्षित यांनी सांगितले. तसेच प्रवासी संघटना याची दखल का ? हा प्रश्न उपस्थित केला आहे.

याबाबत रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले की, ‘व्हिस्टाडोम’ कोचला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कोच निर्मिती करताना सर्व बाजूंचा विचार केला आहे. १८० किंवा ३६० अंशाचा व्ह्यू दिसला नसेल तर याबाबत पाहणी केली जाईल. मात्र याबाबत कोणतीही तक्रार दाखल नाही. पुण्यातून रवाना होताना हा कोच सर्वात शेवटी तर मुंबईतून रवाना होताना हा कोच रेल्वे इंजिनानंतर असतो. ही एक व्यवस्था आहे. गेल्या चार वर्षांपासून क्वीन पहिल्या प्लॅट फॉर्मवर थांबत नाही. पहिल्या प्लॅट फॉर्मवर फक्त २४ कोच पुढील रेल्वे गाड्या थांबतात. रेल्वे सुरक्षा बलचे जवान गस्त घालतात. त्यामुळे रेल्वे प्रवास सुरक्षित आहे. प्रवाशांना असा अनुभव आल्यास लेखी तक्रार करावी‘‘.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()