रुग्ण संख्या कमी पण कोरोनाचा धोका कायम

लसीकरण केंद्रावर सुविधांचा अभाव, प्रशासनावर टीका
Corona Update News
Corona Update Newssakal
Updated on

पुणे : शहरात पंधराच्या पुढील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू असताना महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील सुविधा कमी केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याविरोधात आज सर्वपक्षीय नेत्यांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली यावर खुलासा करण्याची मागणी केली. दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कमी झाला असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले.(Corona Update News)

Corona Update News
नितीन राऊतांना खरंच बैठकीचं निमंत्रण नव्हतं का? पटोले म्हणतात...

महापालिकेच्या मुख्यसभेत शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी लसीकरण केंद्रावर महापालिकेकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत, व्यवस्थित माहिती मिळत नाही, त्यामुळे नागरिक वंचित असल्याचे निदर्शनास आणले. काही नगरसेवकांनी लसीकरण केंद्रावरील शेड, मांडव काढून टाकले आहेत नागरिकांना उन्हात थांबावे लागत आहे, अशी टीका केली.

काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी कोरोनाची स्थिती काय राहणार याचा खुलासा करावा अशी मागणी केली.

Corona Update News
उत्तर प्रदेशची निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल : अमित शहा

लसीकरण केंद्रावर पुरसे कर्मचारी देणार

आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले, "लसीकरण केंद्रावर डेटा एंट्री आॅपरेटर कमी असल्याने त्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण केंद्रावर ३२ डेटा इंट्री आॅपरेटर देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. आणखी ९२ मिळकतकर विभागाचे कर्मचारी मिळणार आहे, त्यांची लवकरच आॅर्डर काढली जाईल. सध्या कोरोनाची साथ सर्वोच्च स्तरावर आहे का हे सांगता येणार नाही. पण गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण संख्येचा उतरता आलेख आहे. . मृत्यूची संख्याही कमी आहे. पण तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे

पण अचानक रुग्णसंख्या वाढल्यास सुविधा देण्यासाठी महापालिका तयार आहे. खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखीव ठेवावे, रुग्णांना दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्या खासगी व शासकीय रुग्णालयातील १३ हजार बेडची माहिती डॅशबोर्डवर आहे. गरज पडल्यास २५ हजार बेडची व्यवस्था करता येईल. तसेच औषध, साहित्य, डाॅक्टर, नर्स यासह सर्व यंत्रणा तयार आहे, असे भारती यांनी सांगितले.

Corona Update News
अजितदादांचा काँग्रेसला दणका, 28 नगरसेवक राष्ट्रवादीत

१५ ते १८ वयोगटात ४० टक्के लसीकरण

शहरात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी राज्य शासनाने १ लाख ७२ हजार जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट दिले आहे. पण पुण्यात किमान २ लाख जणांचे लसीकरण अपेक्षित आहे. आत्तापर्यंत ४० टक्के म्हणजेच ७० हजार मुलांना लस दिली आहे. तसेच १८ वयोगटाच्या पुढे आत्तापर्यंत ११६ टक्के नागरिकांचा लसीचा पहिला डोस व ८५ टक्के नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ३० हजार ७४४ जणांनी लसीचा बुस्टर डोसही घेतला आहे, असे भारती यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.