पुणे : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) स्थापना करून, बेडचेदेखील नियोजन केले आहे. जिल्ह्यात लहान मुलांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ६ हजार १५६ बेडचे नियोजन केले आहे. त्यामध्ये पुणे शहरात एकूण ३ हजार ४२९ बेड, पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ९१३ तर ग्रामीणमध्ये ८१४ बेडचे नियोजन केले आहे.
कोरोनाच्या संभावित तिसरी लाटेमध्ये लहान मुलांना या आजाराच्या संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने नियोजन तयार करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. दरम्यान, या तिसऱ्या लाटेचा विचार करून, प्रशासनाच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारी माहिती देण्यात आली. लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स राज्यस्तरावर स्थापन करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर जिल्हास्तरावरसुद्धा बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहे. पुणे महापालिकेकडून बालरोग तज्ज्ञ व नवजात तज्ज्ञ यांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात ५७२ बालरोग तज्ज्ञ आहेत. पुणे शहरात २५० बालरोग तज्ज्ञ, पिंपरी चिंचवडमध्ये १७२ आणि ग्रामीणमध्ये १२० बालरोग तज्ज्ञ आहेत. संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे. पुणे महापालिका हद्दीतील शासकीय रुग्णालयांमध्ये १ हजार ७१० बेड, तर २९ खासगी रुग्णालयांमध्ये १ हजार ७१९ बेड प्रस्तावित केले आहेत. ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयांमध्ये ६५९ बेड तर १५ खासगी रुग्णालयांमध्ये १५५ बेड प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात ऑक्सिजन विरहित बेड- ३ हजार २९
ऑक्सिजन बेड - २ हजार २३८
आयसीयू बेड- ६०२
व्हेंटिलेटर बेड - ३०५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.