जुनी सांगवीत लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्राचे वाटप

juni-sanghavi
juni-sanghavi
Updated on

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संजय गांधी निराधार योजना समिती अंतर्गत येथील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव प्रभागातील अपंग, निराधार, दिव्यांग, विधवा श्रावणबाळ योजनेत पात्र लाभार्थ्यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण ५९ लाभार्थ्यांना पेन्शन व विविध अर्थसहाय्य मंजुरीपत्र देण्यात आले. 

पिंपळे गुरव येथे झालेल्या कार्यक्रमात ड प्रभाग अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक समिती सदस्य व अध्यक्षांच्या उपस्थितीत पेन्शन पत्राचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, समिती अध्यक्ष नरेंद्र माने, आदिती निकम, नगरसेविका माई ढोरे, संतोष कांबळे, सागर अंगोळकर, सिमा चौगुले, माधवी राजापुरे, हर्षल ढोरे, स्विकृत नगरसदस्य महेश जगताप आदींच्या हस्ते लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी माई ढोरे, संतोष कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

कांबळे म्हणाले, प्रभागातील गरजु पात्र व्यक्तिंना या योजनेतुन लाभ मिळवुन देण्यासाठी काम सुरू असुन कुणीही या योजनेपासुन वंचित राहु नये याची  विद्यमान लोकप्रतिनिधी व समाजसेवक कार्यकर्ते व सामाजिक संस्था यांच्या मार्फत प्रभागात काम सुरू आहे. ढोरे म्हणाल्या, अनेकदा कागदपत्र जुळवा जुळव व माहितीच्या अभावामुळे अनेकजण या योजनेच्या लाभापासुन वंचित राहतात म्हणुन लोकप्रतिनिधींच्या सर्व कार्यालयात योजनांची माहिती सांगण्यासाठी मदतनिस ठेवण्यात आले आहेत. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.