बारामतीकरांनो, कोरोना रिपोर्ट येईपर्यंत घरी जाता येणार नाही

कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या कमी होऊ लागल्यामुळे व्यापारी वर्गाने जनजीवन पूर्वपदावर आणावे, यासाठी प्रशासनावर दबाव वाढवला आहे. मात्र अनलॉक केल्यानंतर पुन्हा लाट आली, तर काय करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे आहे.
Corona Test
Corona TestFile photo
Updated on
Summary

कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या कमी होऊ लागल्यामुळे व्यापारी वर्गाने जनजीवन पूर्वपदावर आणावे, यासाठी प्रशासनावर दबाव वाढवला आहे. मात्र अनलॉक केल्यानंतर पुन्हा लाट आली, तर काय करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे आहे.

बारामती : कोरोनाची आरटीपीसीआर (RTPCR) तपासणी केल्यानंतर आता संबंधित व्यक्तीला त्याचा रिपोर्ट येईपर्यंत विलगीकरणातच राहावे लागणार आहे. कोरोनाच्या तपासणीनंतर (Corona Test) रिपोर्ट येईपर्यंत किमान 24 तासांचा कालावधी सध्या लागत आहे. स्वॅब तपासणीनंतर संबंधित व्यक्ती रिपोर्ट येईपर्यंत अनेकांच्या संपर्कात येते आणि त्याच्यापासून अनेकांना संसर्ग होतो, ही बाब विचारात घेत आता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. (person will not be able to go home till Corona report is received informed Baramati administration)

बारामती शहरात मेडीकल कॉलेज व रयत भवन येथे तसेच बारामती तालुक्यात चार ठिकाणी स्वॅब गोळा करण्याचे केंद्र सुरु आहे. तपासणी झाल्यानंतर लोक गावभर फिरत राहतात, कुटुंबियांसमवेत वेळ व्यतित करतात. अनेकदा पॉझिटीव्ह रुग्ण अनेकांच्या संपर्कात येतात आणि ते सुपर स्प्रेडर ठरतात. या मुळे कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली, असा निष्कर्ष निघाला आहे.

Corona Test
भारतीयांची कमाल; आकाशगंगेतील हायड्रोजनचं मोजलं वस्तुमान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत मुंबईतील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी स्वॅब तपासणीनंतर संबंधिताचा रिपोर्ट येईपर्यंत त्याला घरी सोडायचेच नाही, त्याला तपासणी केंद्रावरील विलगीकरण कक्षातच ठेवायचे आणि रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरही त्याने काही दिवस विलगीकरणातच राहायचे, या बाबींवर भर दिला होता. त्या नुसार आता प्रशासनाने या स्तरावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्याच्या लक्षणानुसार वैद्यकीय अधिकारी पुढील निर्णय घेणार आहेत.

या मुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण इतरांच्या संपर्कातच येणार नाही त्या मुळे इतरांनाही होणारा संसर्ग टाळण्यास मदत होईल, कोरोना रुग्णांची संख्याही या मुळे आटोक्यात येण्यास मदत होईल.

Corona Test
'विश्वस्त आमदार कपिल पाटील यांनी राजीनामा द्यावा'

बारामतीकरांना दिलासा...

दरम्यान गुरुवारी (ता.3) बारामतीत तपासलेल्या 498 नमुन्यांपैकी 49 रुग्ण पॉझिटीव्ह आले. दुस-या लाटेत शुक्रवारी (ता.4) प्रथमच बारामतीची पॉझिटीव्हीटीची टक्केवारी दहापेक्षा खाली आली. बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वेगाने वाढले आहे. आजपर्यंत 24549 रुग्ण बाधित झाले असून 23028 रुग्ण बरे झाले आहेत. 625 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

व्यापाऱ्यांचा दबाव वाढू लागला...

कोरोना रुग्णांची झपाट्याने संख्या कमी होऊ लागल्यामुळे व्यापारी वर्गाने जनजीवन पूर्वपदावर आणावे, यासाठी प्रशासनावर दबाव वाढवला आहे. मात्र अनलॉक केल्यानंतर पुन्हा लाट आली, तर काय करायचे हा प्रश्न प्रशासनापुढे आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासह तपासण्यांची संख्या वाढविण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या पुढील काळात स्वत:हून लोक तपासणीसाठी आले नाही, तर कम्युनिटी बेस्ड तपासण्या सुरू करण्याबाबत प्रशासन आराखडा तयार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(Edited by : Ashish N. Kadam)

पुणे जिल्ह्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.