Pune Dog Attack : थकीत पैसे मागीतल्याने अंगावर सोडला कुत्रा; महिला गंभीर जखमी, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बचत गटातील थकीत रक्कम मागण्यासाठी आरोपी ज्योती शिर्के हिच्या घरी गेल्या होत्या.
pet dog attacked woman after unleashed by owner  case filled against two yerwada marathi crime news
pet dog attacked woman after unleashed by owner case filled against two yerwada marathi crime news
Updated on

पुणे : बचत गटाच्या थकीत पैशाची मागणी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर पाळीव श्वान सोडल्याचा प्रकार रविवारी येरवड्यात घडला. श्वानाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका ४० वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्योती रघुनाथ शिर्के (वय ४२) आणि तिचा पुतण्या मिहीर शिर्के (वय २५, दोघे रा. गांधीनगर येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बचत गटातील थकीत रक्कम मागण्यासाठी आरोपी ज्योती शिर्के हिच्या घरी गेल्या होत्या. थकीत पैसे मागितल्याने शिर्के आणि तिचा पुतण्या मिहीर यांनी महिलेला शिवीगाळ, तसेच दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या घरातील पाळीव श्वान महिलेच्या अंगावर सोडले.

pet dog attacked woman after unleashed by owner  case filled against two yerwada marathi crime news
Hathras Stampede: ट्रॉमा सेंटर जिथे ना ऑक्सिजन होता, ना जनरेटरमध्ये तेल; उपचारांशिवाय जखमींनी गमावला जीव

श्वानाने महिलेच्या उजव्या हाताचा तीन ते चार वेळा चावा घेतला. श्वानाच्या चाव्यामुळे हात रक्तबंबाळ झाला. महिलेने आरोपी शिर्के यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली. तेव्हा आरोपींनी महिलेला मदत न करता घराचा दरवाजा आतून बंद केला. पाळीव श्वानाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

pet dog attacked woman after unleashed by owner  case filled against two yerwada marathi crime news
Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेतील बाबाच्या खोलीत फक्त मुलींनाच प्रवेश दिला जायचा? नारायण साकारबद्दल अनेक धक्कादायक खुलासे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com