Manja : मांजाचा वापर टाळण्यासाठी पेटाची जनजागृती मोहीम

पतंगांना उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अनेक पक्षी-प्राणी तसेच लोकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.
PETA awareness campaign to prevent Manja consumption
PETA awareness campaign to prevent Manja consumptionsakal
Updated on
Summary

पतंगांना उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अनेक पक्षी-प्राणी तसेच लोकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.

पुणे - पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजात अडकून जखमी झालेल्या पक्ष्यांच्या वेशभूषेत असलेली तरुणाई हातात फलके घेऊन ‘मांजा नका वापरू, जखमी करू नका पाखरू’ असा संदेश देत लोकांना मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन करताना. हे दृश्‍य होते शुक्रवारी फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) इंडियाच्या वतीने राबविण्यात आलेल्या एका अनोख्या जनजागृती मोहिमेचे.

मकर संक्रांत हा सणात आकर्षणाचे केंद्र असते ते म्हणजेच विविध रंगांच्या पतंग. या निरनिराळ्या पतंगांना उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अनेक पक्षी-प्राणी तसेच लोकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.

यासाठी नायलॉन मंजाच्या वापरावर बंदी असून बाजारपेठांमध्ये ते उपलब्ध होत आहेत. या मांजामुळे होणाऱ्या जीवितहानीकडे सर्रास दुर्लक्ष करत नागरिक मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर करतात. याबाबत लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याच्या अनुषंगाने पेटाद्वारे मांजाचा विरोध करत निदर्शने करण्यात आली.

यावेळी पेटाची मोहीम व्यवस्थापक राधिका सूर्यवंशी म्हणाला, ‘‘काच व धातूने तयार करण्यात आलेल्या मांजामुळे आजवर कित्येक लोकांचे आणि पक्ष्यांची जीवितहानी झाल्या आहेत. मांजात अडकून किंवा तायमुळे कापल्याने दरवर्षी हजारो पक्षी मरतात. तुटलेला मांजा बराच काळ झाडांवर किंवा इमारतीवर अडकून राहिल्याने पर्यावरणावर ही त्याचा परिणाम होतो. तर बऱ्याचदा मांजा वीज पुरवठा वाहिन्यांभोवती अडकल्याने शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या, वीजपुरवठा बंद होण्याबरोबर, विजेचा झटका लागल्याने मृत्यू होण्याचा ही धोका असतो. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन संक्रांत सण साजरा करताना अशा मांजाचा वापर न करणेच योग्य आहे.’’

जखमी पक्षी-प्राण्यांची नोंद नाही -

मांजामध्ये अडकून मृत्यू झालेल्या किंवा दुखापत झालेल्या पक्षी आणि प्राण्यांची नोंद होत नाही. त्यामुळे एकूण मांजामुळे किती पक्षी किंवा प्राण्यांचा मृत्यू झाला याची ठराविक आकडेवारी उपलब्ध होत नाही. अग्निशामक दल, विविध संस्था, नागरिकांद्वारे मांजात अडकलेल्या प्राण्यांना सोडविण्यात किंवा यामुळे जखमी झालेल्या पक्षी व प्राण्यांना उपचार दिले जाते. मात्र अशा किती घटना घडल्या आहेत याचा डेटा राखला जात नाही. यावर ही विचार करण्याची गरज असून अशा प्रकारच्या नोंदणी राखण्यासाठी विशिष्ट पावले उचलण्याची गरज असल्याचे पेटा संस्थेच्या स्वयंसेवकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.