पुणे : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या विरोधात याचिका दाखल

Amitabh-Bachchan
Amitabh-Bachchan
Updated on

पुणे : वकिलांची जाहिरात केल्याप्रकरणी 'जस्ट डायल' कंपनी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकिलांची जाहिरातबाजी करण्यास कंपनीला मनाई करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

येथील वकील वाजेद खान यांनी बच्चन आणि 'जस्ट डायल'चे व्ही. एस. एस. मणी यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे. जाहिरात केल्यास वकिलांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून नुकताच देण्यात आला आहे. बार कौन्सिलच्या नियम 36 प्रमाणे वकिलांना स्वतःची जाहिरात करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे.

जस्ट डायल 8888888888 या दूरध्वनी क्रमांकावरून वकील पुरविण्याचे काम करीत आहे. अर्जदारांची परवानगी न घेता त्यांचे नाव जस्ट डायलने फ्री लिस्टिंगमध्ये टाकले आहे. लिस्टमध्ये नाव येण्यासाठी 24 हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. पैसे देणाऱ्या वकिलांची नावे यादीत वर येत आहे. त्यामुळे वकिलांमध्ये टॉपटेनची घाणेरडी स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रतिवादी हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जाहिरात करून वकिलांना पैसे मिळवून देत आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

जस्ट डायलला वकिलांची आणि तक्रारदारांची जाहिरात करण्यात बंदी घालावी आणि प्रतिवाद्यांना न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात आदेश करावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. बच्चन हे जस्ट डाइलचे ब्रँड ऍम्बेसिडर आहेत. त्यामुळे त्यांना देखील प्रतिवादी करण्यात आल्याचे ऍड. खान यांनी सांगितले. या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.