पुण्यात  सलग आठव्या दिवशी पेट्रोल दरवाढीचा भडका 

petrol-rate
petrol-rate
Updated on

पुणे - कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. पुण्यातील पेट्रोलचा दर 82. 43 रुपयांवर जाऊन पोहोचला असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. दरम्यान, सोमवारपासून हे दर स्थिर राहण्याची शक्‍यता आहे, असे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. 

संचारबंदीच्या काळात पुण्यात केवळ अत्यावश्‍यक वाहतूक सेवा सुरू होती. 3 जूननंतर शहरातील व्यवहार सुरू झाले. मात्र, त्याचवेळी वाढत गेलेल्या इंधन दरवाढीचा फटका पुणेकरांना बसला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅलर 45 डॉलरपर्यंत गेली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत गेले आहेत. मात्र, सोमवारपासून इंधनाचे दर स्थिर राहतील. इतक्‍यात हे दर कमी होण्याची शक्‍यता कमी आहे, असे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले. 

22 लाख लिटर इंधन विक्री 
साधारण स्थितीत पुण्यात रोज 30 लाख लिटर पेट्रोल विक्री होते. लॉकडाउन काळात ती कमी होऊन केवळ 3 लाख लिटरवर आली होती. सध्या रोज किमान 20 ते 22 लाख लिटर विक्री होत आहे, असे दारूवाला यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशी झाली दरवाढ 

7 जून 
पेट्रोल 78.67 
डिझेल 67.55 

8 जून 
पेट्रोल 79.25 
डिझेल 68.11 

9 जून 
पेट्रोल 79.77 
डिझेल 68.65 

10 जून 
पेट्रोल 80.15 
डिझेल 69.07 

11 जून 
पेट्रोल 80.73 
डिझेल 69.62 


12 जून 
पेट्रोल 81.27 
डिझेल 70.17 

13 जून 
पेट्रोल 81.84 
डिझेल 70.71 

14 जून 
पेट्रोल 82.43 
डिझेल 71.31 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.