पुण्यातील चित्रे जर्मनीतील कॅलेंडरवर

अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या पुण्याच्या राशी राजीव शहा या विद्यार्थिनीचे दोन चित्रे जर्मनीतील एका इन्स्टिट्यूटच्या कॅलेंडरवर झळकली आहे.
German Calender
German CalenderSakal
Updated on
Summary

अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या पुण्याच्या राशी राजीव शहा या विद्यार्थिनीचे दोन चित्रे जर्मनीतील एका इन्स्टिट्यूटच्या कॅलेंडरवर झळकली आहे.

पुणे - अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या पुण्याच्या राशी राजीव शहा (Rashi Rajiv Shaha) या विद्यार्थिनीचे (Student) दोन चित्रे (Picture) जर्मनीतील (German) एका इन्स्टिट्यूटच्या कॅलेंडरवर (Calender) झळकली आहे. राशीने चितारलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत (Pune University Building) आणि जनरल पोस्ट ऑफिसची (Post Office) इमारत गोएथे इन्स्टिट्यूट मॅक्समूलर भवनच्या या वर्षीच्या कॅलेंडरसाठी निवडण्यात आली आहे.

पुण्याचा सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या या दोन्ही इमारती पूरक असल्याचे राशी सांगते. ती म्हणते, ‘शहराचे सांस्कृतिक वैभव आणि जनजीवनाची घट्ट नाळ या दोन इमारतींमध्ये आहे. इन्स्टिट्यूटच्यावतीने मागील वर्षी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यावेळी मी या दोन इमारतींचे चित्र रंगांच्या साहाय्याने काढले. कुंचल्याच्या प्रत्येक छटेमध्ये मला इमारतीचे सौंदर्य उलगडत गेले. प्रत्येक चित्राने मला नवं काही शिकवत आहे.’

German Calender
पुण्यात उरले आता १४,३५२ सक्रिय कोरोना रुग्ण; रविवारी दिवसात २७४६ नवे रुग्ण

शहरातील इतर विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात राशीच्या चित्राची निवड करण्यात आली. या दोन्ही इमारती ब्रिटिशकालीन असून, पूर्णपणे ब्रिटिश शैलीत देखण्या पद्धतीने बांधण्यात आल्या आहे. घडीव बेसॅाल्ट दगडांचा सुबक वापर या इमारतींचे सौंदर्यात भर घालतात. राशीने आपल्या कूंचल्यांनी सहज शैलीत या वास्तूंना चित्रबद्ध केले असून, तिच्या या कलेची ‘मॅक्समूलर भवन’ने दखल घेतली आहे. राशी सध्या सिंबॅायसीस कॅालेजमध्ये वाणिज्य शाखेत शिकत आहे.

प्रत्येक चित्र आपल्याला नवा अवकाश प्रदान करते. चित्रांबरोबर दिवसेंदिवस आपला दृष्टिकोन आणि विचार प्रगल्भ होत जातो. मी जरी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असले, तरी संशोधनातून कलेतील नव्या गोष्टी मी शिकत आहे. छंदाबरोबरच मी करिअर म्हणून चित्रकलेकडे पाोहते.

- राशी शहा, विद्यार्थीनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.