Pune News : पिंपरी-चिंचवडच्या स्फोटातील इतर दहा जणांची प्रकृती गंभीर; जिल्हाधिकारी ससूनमध्ये, रुग्णांची केली चौकशी

pune blast
pune blastesakal
Updated on

पुणे : तळवडे एमआयडीसी येथील फटाक्यांच्या कारखान्यात आगीमध्ये जखमी झालेल्या दहा रुग्णांना ससून रुग्णालयात सायंकाळी दाखल करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली.

ससून रुग्णालयात शिल्पा राठोड (वय ३१), प्रतीक्षा तोरणे (वय १६), अपेक्षा तोरणे (वय २६), कविता राठोड (वय ४५), रेणुका ताथोड, (वय २०), शरद सुतार (वय ४५), कोमल चौरे (वय २५), सुमन (४०), उषा पाडवे (४०) आणि प्रियंका यादव (३२) असे १० रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कविता राठोड आणि शिल्पा राठोड या मायलेकी दोघीही कारखान्यात कामाला होत्या.

तळवडे येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपूस केली. सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुजित दिव्हारे, डॉ. हरीश टाटीया आदी उपस्थित होते.

pune blast
Nawab Malik: "मलिकांची तब्येत ठिकठाक, त्यांना तातडीने आर्थर रोड जेलमध्ये पाठवा'', भाजप नेत्याची मागणी

तळवडे येथील कारखान्यात बहुतांश महिला कामगार होत्या. गंभीर जखमी झालेल्या रुग्णांपैकी नऊ महिला आणि एक पुरुष आहे. जखमींपैकी पाच रुग्ण ८० टक्के भाजले असून उर्वरित पाच जण ३० ते ६० टक्के भाजले आहेत. कारखान्यात लागलेल्या आगीचा धूर नाका-तोंडात गेल्यामुळे रुग्णांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. जखमींपैकी चार जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती ससून रुग्णालयातील सहायक प्राध्यापक डॉ. निखिल पानसे यांनी दिली.

pune blast
Devendra Fadnavis Letter Bomb : मलिक हे अजित पवार गटात आहेत की नाहीत? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं भेटीचं कारण

सहा महिलांचा मृत्यू

दरम्यान, स्पार्कल कॅण्डल बनविण्याच्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाल्याने कारखान्यामधील सहा महिलांचा मृत्यू झाला. आग इतकी भयंकर होती की मृतांची ओळख पटणे मुश्किल झाले होते. राणा इंजिनिअरिंगच्या कंपाऊंडमध्ये एका छोट्या औद्योगिक शेडमध्ये हा छोटा कारखाना होता. रेडझोन असल्याने या भागात बहुतांश औद्योगिक शेड अनधिकृत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.