पिंपरी : बेकायदेशीर तलाक प्रकरणी तिघांवर गुन्हा

Will Scrap Triple Talaq If Comes To Power Says Congress
Will Scrap Triple Talaq If Comes To Power Says Congress
Updated on

पिंपरी : पैसे व मोटार न दिल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पती शोएब अथर सिद्दिकी (वय ३६), सासरा अथर सिद्दिकी (वय ७२), सासू (वय ६५, सर्व रा. भोपुरारोड, साहिबाबाद, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित विवाहिता व आरोपी शोएब यांचे मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे लग्न झाले होते. त्यानंतर आरोपींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला.

Will Scrap Triple Talaq If Comes To Power Says Congress
लस प्रमाणपत्र आता मिळणार व्हॉट्सऍपवर; 'अशी' आहे सहजसोपी प्रक्रिया

सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केला. पैसे, मोटार न दिल्याने पतीने विवाहितेला तीन तलाकची नोटीस पाठवून बेकायदेशीर तलाक दिला. तसेच विवाहितेचे स्त्रीधन परत केले नाही. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

काय आहे ट्रीपल तलाक कायदा?

या कायद्यात तलाक देण्यात आलेल्या महिलेला व तिच्या मुलांना पोटगी देण्याचीही तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाक बेकायदा ठरवूनही तो सुरूच असल्याने हा कायदा करण्यात येत आहे. या कायद्यान्वये पत्नीला तोंडी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागतो. कारण ट्रिपल तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यामध्ये आहे. या कायद्याअंतर्गत बोलून, लिहून, ई-मेल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपद्वारे यानुसार कोणत्याही पद्धतीने दिला गेलेला ट्रिपल तलाक बेकायदा व अमान्य असेल आणि कायद्यानुसार संबंधित पतीला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.