अनधिकृत फटका स्टॉल विरोधात महावितरणची पोलिसांकडे तक्रार 

अनधिकृत फटका स्टॉल विरोधात महावितरणची पोलिसांकडे तक्रार 
Updated on

पिंपरी - डीलक्‍स चौकात उभारण्यात आलेल्या अनधिकृत फटाका स्टॉलच्या कामात महावितरणची मुख्य 22 केव्ही उच्चदाब भूमिगत वाहिनी तुटली. त्यामुळे तब्बल चार हजार ग्राहकांचा सुमारे अकरा तास वीजपुरवठा खंडित झाला. तर महावितरणचे एक लाख 35 हजारांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 13) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याने पिंपरी पोलिस ठाण्यात अनधिकृत फटाका स्टॉलधारक राजेश जगन्नाथ यादव याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. डीलक्‍स चौकात फटाका स्टॉल उभारणीसाठी लोखंडी पहार जमिनीत ठोकण्यात आली. मात्र, या पहारीमुळे त्याठिकाणी भूमिगत गेलेली 22 केव्ही वीजवाहिनी तुटली. त्यामुळे परिसरातील वीजप्रवाह खंडित झाला. खंडित वीजपुरवठ्याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महावितरणच्या अभियंत्यांनी वीजप्रवाह खंडित झाल्याचे कारण शोधले असता, त्यांना हा प्रकार उघडकीस आला. रस्ता खोदून दुरुस्ती करण्यासाठी साडेनऊ वाजले. पाऊस असल्याने दुरुस्तीसाठी अडचणी अाल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.