पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यांवर खड्डेच खड्डे

खड्डे, पावसाचे पाणी साठणे व वाढती अतिक्रमणे अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हा रस्ता सापडला आहे.
katraj kondhwa road
katraj kondhwa roadsakal
Updated on

कात्रज : कात्रज-कोंढवा (katraj kondhawa) रस्त्याचे काम जागा हस्तांतरणाअभावी अतिसंथ गतीने सुरु आहे. त्यामुंळे रस्त्याच्या कामात गेली दोन वर्षे अडचणी येत आहेत. अशातच रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवशंभोनगर गल्ली क्रमांक ३च्या समोर अशाच प्रकारचे मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतूकदारांना अडचण होत आहे. खड्ड्यातून गाडी गेल्यास दुचाकीचालकांच्या अंगावर पाणी उडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हे खड्डे लवकर बुजविण्यात यावेत अशी मागणी जोर धरत आहे.

खड्डे, पावसाचे पाणी साठणे व वाढती अतिक्रमणे अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हा रस्ता सापडला आहे. अशातच रस्त्यांवर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे किमान देखभाल दुरुस्ती करून दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. खड्डे मोठ्या प्रमाणांवर पडले असल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही याठिकाणी सातत्याने घडत आहेत. तसेच पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधी सुटली असून डास आणि मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर जून महिन्यात अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी रस्त्यांची पाहणी करून वापरातील रस्ता दुरुस्ती व पर्यायी रस्ता विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे एस्टीमेट तयार करायला सांगून त्यासाठी लवकरच मान्यता घेऊन निविदा काढल्या जातील असेही म्हटले होते. त्याचबरोबर, कारवाईनंतर झालेली अतिक्रमणे काढून ताब्यातील रस्ता विकसित करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना खेमणार यांनी दिल्या होत्या. मात्र, त्यावर कुठलीही अंमलबजावणी झाली नाही. उलट रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क करण्यात आलेला आहे. परंतु, कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही. पाऊस पडल्यानंतर खड्ड्यात पाणी साचते. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाचे पाणी सातत्याने साचून राहते. लवकरात लवकर कारवाई करून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात यावे.

- राहुल काळे, स्थानिक रहिवासी.

पावसामुळे या अडचणी निर्माण होत असून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवशंभोनगर गल्ली क्रमांक ३ जवळील खड्डे आणि कात्रज-कोंढवा रस्त्यावरी छोटे-मोठे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येतील.

- धनंजय गायकवाड, अभियंता पथविभाग, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()