Mahadaji Shinde Chatri : पुणे परिसर दर्शन : महादजी शिंदे छत्री

महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पूत्र आणि ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू. लहान वयापासून राणोजी यांच्या बरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला.
Mahadaji Shinde Chatri
Mahadaji Shinde Chatrisakal
Updated on
Summary

महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पूत्र आणि ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू. लहान वयापासून राणोजी यांच्या बरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला.

महादजी शिंदे पेशवाईमधील एक मातब्बर सरदार. ते पुण्याजवळ वानवडी येथे १२ फेब्रुवारी १७९४ रोजी भैरोबा नाल्याच्याकाठी स्वर्गवासी झाले. महादजींचे वारसदार माधवराव शिंदे (सिंधिया) प्रथम (१८७६ ते १९२५) यांनी महादजींचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्याच जागेवर छत्री बांधली. इ. स. १९१५ मध्ये या छत्रीचे बांधकाम सुरू झाले, ते १९१९ मध्ये पूर्ण झाले. १७९४ मध्ये मृत्यूपूर्वी महादजींनी बांधलेल्या शिवालयापुढेच छत्री बांधून त्यांचे स्मारकही तिथे बांधले. ही छत्री म्हणजे राजस्थानी आणि ब्रिटिश बांधकाम शैलीचा सुंदर मिलाफ आहे. खिडक्यांची तावदाने, रंगसंगती जुन्या ब्रिटिश पद्धतीची आणि आतील कमानी, नक्षीकाम राजस्थानी पद्धतीचे आहे. आतमध्ये शिंदे घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची चित्रे लावली आहेत. तिथेच एक संग्रहालय करण्याचा या घराण्याचा मानस आहे. या छत्रीचा ताबा सिंधिया देवस्थान ट्रस्ट, ग्वाल्हेर यांच्याकडे आहे.

महादजी शिंदे हे राणोजी शिंदे यांचे पूत्र आणि ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणणारे दत्ताजी शिंदे यांचे बंधू. लहान वयापासून राणोजी यांच्या बरोबर त्यांनी अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला. तसेच पेशव्यांच्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला. पानिपतच्या लढाईतही महादजी सहभागी झाले होते. तिथे त्यांच्या पायाला एक दुखापत झाली आणि तेव्हापासून त्यांचा एक पाय कायम अधू झाला. १७७९ची वडगावची लढाई त्यांनी पेशव्यांच्या साथीने इंग्रजांविरुद्ध लढली आणि इंग्रजांना पराभूत केले. त्यावेळी त्यांनी इंग्रजांकडून आपल्या अटी कबूल करून घेतल्या. १७४५ ते १७६१ या पेशवाईच्या सुवर्णकाळात त्यांनी जवळपास ५० छोट्या-मोठ्या लढायांचे नेतृत्व केले किंवा सहभाग घेतला.

यातील काही महत्त्वाच्या लढाया म्हणजे माळवा, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड, हिम्मतनगर, ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर, चंद्रावतीगंज आणि फतेहाबाद. पुढे शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. त्यांनी १७५८ मध्ये ग्वाल्हेर येथे राजधानी हलवली. राजपुताना आणि दिल्लीच्या लढायांमध्ये विजय मिळवून पानिपतानंतर गेलेली पेशव्यांची पत परत मिळवून दिली. १७८२ मध्ये इंग्रजांची बाजू वरचढ आहे, हे बघून त्यांनी तह केला आणि आपले राज्य शेवटपर्यंत ताब्यात ठेवले. इंग्रज महादजींचा उल्लेख ‘द ग्रेट मराठा’ असा आदराने करत.

काय पहाल

हनुमान मंदिर, महादजी शिंदे यांचे समाधी मंदिर, विठ्ठल मंदिर, शिवालय आणि त्याचा सभामंडप म्हणजेच छत्री. महादजी यांचा मान म्हणून छत्रीच्या आवारात भर पावसातसुद्धा छत्री न वापरण्याची पद्धत आहे. छत्री बघण्यास १० रुपये प्रवेश शुल्क आहे.

कसे पोहचाल

वानवडी येथे पीएमपी बसने अथवा स्वतःच्या वाहनाने जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.