Shivneri Fort : पुणे परिसर दर्शन : शिवजन्माने पवित्र झालेला शिवनेरी

शिवनेरी हा महाराष्ट्राचा मानबिंदू, अवघा महाराष्ट्र ज्यांच्यावर प्रेम करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्यावर जन्म झाला. या किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकापासून आहे.
Shivneri Fort
Shivneri FortSakal
Updated on
Summary

शिवनेरी हा महाराष्ट्राचा मानबिंदू, अवघा महाराष्ट्र ज्यांच्यावर प्रेम करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्यावर जन्म झाला. या किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकापासून आहे.

शिवनेरी हा महाराष्ट्राचा मानबिंदू, अवघा महाराष्ट्र ज्यांच्यावर प्रेम करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्यावर जन्म झाला. या किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकापासून आहे. हा किल्ला साधारण दोन हजार वर्षांपासून अस्तित्वात असावा, कारण हा नाणेघाट या अतिप्राचीन व्यापारी मार्गाचा रक्षक आहे, पंधराव्या शतकात यादवांकडे असलेला हा किल्ला बहामनी राज्यात मलिक उलतुजारने आणला.

पुढे शंभर वर्षे हा किल्ला नगरच्या निजामाकडे होता. तो सतराव्या शतकात काही वर्षे आदिलशहाकडे आणि पुढे मुघलांकडे होता. पुढे शाहू महाराजांतर्फे हा किल्ला पेशवे बाळाजी बाजीराव यांनी स्वराज्यात आणला आणि तो इंग्रजांकडून १९४७ मध्ये भारतात आला. छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० मध्ये झाला. त्यामुळेच अवघा महाराष्ट्र या किल्ल्याला पवित्र स्थान मानतो.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

काय पहाल

एकाच वाटेवर सात दरवाजे असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे, पहिला महादरवाजा, दुसरा परवानगी दरवाजा, तिसरा हत्ती दरवाजा, चौथा पीर दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलूप दरवाजा, यात काही दरवाजांवर द्वारशिल्पं आहेत. गडावर जाताना शिवाई देवीचे छोटेखानी मंदिर लागते, ज्याच्या नावावरून शिवरायांचे ‘शिवाजी’ हे नाव ठेवले, असे म्हणतात.

गडावर अंबरखाना, गंगा जमुना तलाव, बदामी तलाव, कमानी टाकी, हमामखाना, कमानी मशीद, कोळी चौथरा अशा वस्तू आहेत; पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गडावरील शिवजन्मस्थान आणि जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या मूर्ती असलेली जागा. गडाच्या उत्तर टोकाला कडेलोटाची जागा आहे, गडाच्या पोटात बऱ्याच बौद्ध गुहा आणि लेणी असल्यामुळे हा गड बराच प्राचीन समजला जातो.

कसे पोहचाल

पुण्याहून जुन्नरला एसटी बसने जाऊन पुढे जीपने शिवनेरीच्या पहिल्या दरवाजापर्यंत जाता येते किंवा साखळी वाटेने पायी जाता येते. वर जाण्यास साधारण अर्धा ते एक तास व गड बघायला सुमारे २ तास लागतात. पूर्ण दिवसाची उत्तम सहल होऊ शकते.

(ही माहिती संक्षिप्त स्वरूपात असून, सविस्तर माहितीसाठी याविषयीची पुस्तके किंवा संदर्भग्रंथ अभ्यासावेत.)

सतीश मराठे, इतिहासप्रेमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()