Trishund Ganpati Mandir : पुणे परिसर दर्शन : त्रिशुंड गणपती मंदिर

आज जागतिक वारसा दिन. यानिमित्त पुण्याच्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिराची माहिती जाणून घेऊयात.
Trishund Ganpati Temple
Trishund Ganpati Templesakal
Updated on
Summary

आज जागतिक वारसा दिन. यानिमित्त पुण्याच्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिराची माहिती जाणून घेऊयात.

आज जागतिक वारसा दिन. यानिमित्त पुण्याच्या सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिराची माहिती जाणून घेऊयात. हे मंदिर पेशवाई काळातील आहे. सन १७५२ ते १७७० याकाळात त्याचे बांधकाम झाले असावे. त्रिशुंड म्हणजे तीन सोंडेचा गणपती. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधले आहे. आत प्रवेश करताच समोरील वेगवेगळ्या मूर्ती आपले लक्ष वेधून घेतात. दरवाजात दोन द्वारपाल आणि वर गणेशपट्टीमध्ये डाव्या सोंडेचा गणपती आहे.

दरवाजाच्या दोन्ही बाजूला एकशिंगी गेंड्याचे शिल्प आहे. या गेंड्याला काही साखळ्यांनी जखडलेले असल्याचे दिसते. त्याच्यासमोर हातात बंदूक घेतलेले तीन टोपीकर सैनिक आहेत. गेंड्याच्या शिल्पाखाली हत्तीच्या झुंजीचे शिल्प आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेचा गणपती आहे. तेथील गणेशाची प्रतिमा रेखीव आहे. तीन सोंड असलेला गणपती मयूरासनावर विराजमान आहे. गणेशाच्या बाजूला रिद्धी-सिद्धी अन् खाली गण दाखवले आहेत. मूर्तीच्या मागे डोक्यावर शेषशाही विष्णू कोरलेला आहे. त्याच्यावरती श्रीगणेश यंत्र कोरलेले आहे.

प्रदक्षिणामार्गावर विठ्ठल रखुमाई, नटेश्वर आणि शंकराची लिंगोद्भव प्रतिमा आहे, म्हणजे लिंगरूपी शंकराची मूर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूला हंस व खालच्या बाजूला वराह या विष्णू आणि ब्रह्मदेव यांची प्रतीकात्मक आकृती आहे. त्यासंदर्भात एक पुराणकथाही प्रसिद्ध आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एक संस्कृत आणि एक फारसी शिलालेख कोरलेला आहे. एकूण गजबजलेल्या पेठेच्या वस्तीमध्ये छान, शांत आणि दगडी कोरीव काम असलेल्या या मंदिरात एकदा अवश्य भेट द्यावी असे आहे.

त्रिशुंड गणेश मंदिराजवळच नागेश्वर मंदिर आहे, हे सात ते आठशे वर्षे पुरातन असावे. त्यात बऱ्याचदा दुरुस्ती केली गेली. पेशवे काळात मोठ्या दुरुस्त्या झाल्या, पण हे मंदिर अजूनही पुरातन बाज टिकवून आहे. लाकडी सभामंडप, दोन दगडी दीपमाळा, डौलदार नंदी, विष्णू , दत्त, शनिदेव, गणपती आणि हनुमान यांच्या सुबक मूर्ती आहेत. या मंदिराच्या जवळच कसबा पेठेत पेशवेकालीन गुंडाचा गणपती मंदिर आहे. नाना फडणवीस यांचे सहकारी नागोजी गुंड यांच्या घरी हे मंदिर होते. तेही भेट द्यायला उत्तम आहे.

काय पहाल

मंदिरावरील आणि आतील सर्व मूर्ती, मंदिर निर्माण करण्याची पद्धत.

कसे पोहचाल

सोमवार पेठेत त्रिशुंड गणपती आणि कसबा पेठेत गुंडाचा गणपती ही दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.