Girish Mahajan : स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठीचे नियोजन करा; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

‘निर्मलवारी’च्या पूर्वतयारी आढावा बैठक
आमदार गिरीश महाजन
आमदार गिरीश महाजनsakal
Updated on

पुणे ः संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांबरोबर ग्रामविकास विभागाची ‘निर्मलवारी’ यंदाही जाणार आहे. ही निर्मलवारी स्वच्छ व सुरक्षितपणे पार पडली पाहिजे. यासाठीचे काटेकोरपणे नियोजन करावे. या पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छ, निर्मल व सुरक्षित वारीसाठी बारकाईने नियोजन करा, असा आदेश राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता.१९) वारीशी संबंधित सर्व जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

आमदार गिरीश महाजन
Rahul Gandhi News: वायनाड सोडून राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं? जाणून घ्या ५ कारणं...

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालख्यांबरोबर जाणाऱ्या निर्मलवारीची पूर्वतयारी पाहण्यासाठी महाजन आणि आज पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपायुक्त समीक्षा चंद्राकार, वर्षा लड्डा-उंटवाल, विजय मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते. याशिवाय सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आमदार गिरीश महाजन
Dhule Crime News : दुचाकीसह मोबाईल हस्तगत; एलसीबीची कारवाई

महाजन पुढे म्हणाले, ‘‘यावर्षी पालखी सोहळ्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पालखी सोहळ्यासाठीची आवश्‍यक सर्व कामे ही पारदर्शक आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी, पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल, याची विशेष खबरदारी घ्यावी. स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पंढरपूर येथे पालखी तळावर पुरेशा प्रमाणात आणि मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या ठेवाव्यात’’.

वारकऱ्यांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी करावी. पाण्याच्या स्रोतांचे शुद्धीकरण व्यवस्थितपणे केले जावे. त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करावी. जळगाव जिल्हा परिषदेने संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे दोन टँकर पंढरपूरपर्यंत उपलब्ध करून द्यावेत. पालखी मार्गावरील रेस्टॉरंट, हॉटेल्स यांची स्वच्छता व अन्न शुद्धतेची खात्री करावी. पंढरपूर शहरातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी वाढीव मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्था करावी, आदी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे संभाव्य नियोजनाची माहिती दिली. पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक व जळगाव या पाच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.