Mahametro Route Plan : मेट्रोच्या विस्तारीत मार्गांचा आराखडा महामेट्रोला सादर

महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. त्यामध्ये या दोन मार्गांचे डीपीआर सुधारणांसह महामेट्रोला सादर केले.
Pune Metro
Pune Metrosakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग या मेट्रोच्या ४४.८ किलोमीटर लांबीच्या मार्गाला मान्यता दिल्यानंतर आज हे दोन्ही प्रस्ताव महामेट्रोकडे सादर करण्यात आले आहेत. महामेट्रोकडून राज्य सरकार व केंद्र सरकारडून या प्रस्तावांना मान्यता मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल.

शहरातील मेट्रोचे जाळ विस्तारण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार महामेट्रोने खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या मार्गांचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला. २०२२ मध्ये हे डीपीआर महापालिकेला सादर करण्यात आले.

महापालिकेने विविध ९ विभागांचा अभिप्राय घेतला. त्यामध्ये आवश्‍यक त्या सूचना करून व बदल करू हा प्रस्ताव स्थायी समितीने ४आॅगस्टला मंजूर केला. तर १४ ऑगस्टला त्यास मुख्यसभेनेही यास मान्यता दिली.

मेट्रो कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने त्यामध्ये महापालिकेला आर्थिक भार पडणार नाही अशी तरतूद करून कर्जाच्या माध्यमातून निधी उभारता येणार आहे. महापालिकेला केवळ भूसंपादनासाठी आवश्‍यक असलेली द्यावी लागणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी १२ हजार ६८३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. त्यामध्ये या दोन मार्गांचे डीपीआर सुधारणांसह महामेट्रोला सादर केले आहेत. महामेट्रोकडून राज्य व केंद्र सरकारकडून हे प्रस्ताव मान्य करून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

खर्च वळता करणार

महामेट्रोतर्फे काम करताना पावसाळी गटार, सांडपाणी वाहिनी, पदपथ, रस्ते खराब झाले आहेत. याची दुरुस्ती महामेट्रोने करणे अपेक्षित आहे. पण महापालिकेने ‘जी२०’ व पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कामे करून घेतली आहे. महापालिकेला महामेट्रोचे १५० कोटी रुपये देणे आहेत, त्यातून हा खर्च महापालिका वळता करून घेणार आहे. उर्वरित रक्कम महामेट्रोला दिली जाईल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

‘मेट्रोच्या विस्तारित मार्गांना महापालिकेने मान्यता दिल्यानंतर हे प्रस्ताव आज महामेट्रोला सादर केले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या पुढच्या मान्यता घेण्यासाठी कार्यवाही सुरू होईल.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

असा आहे मेट्रो मार्ग

  • वनाज ते चांदणी चौक - १.२ किमी

  • रामवाडी ते वाघोली - ११.६३ किमी

  • खर्च - ३६०९ कोटी

  • खडकवासला ते खराडी - २५.८६ किमी

  • पौड फाटा ते माणिकबाग - ६.११ किमी

  • खर्च -९०७४ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.