पुणे - गेल्या दोन दिवसांपासून शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू झालेले असून, पुढील तब्बल ४० महिने हे काम चालणार आहे. या कामा मुळे गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार असल्याने या ठिकाणची वाहतूक सुरळीत होण्यासाठी उपाय योजना करा असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेला दिले आहेत. यामध्ये रस्ता रुंदीकरण, पर्यायी रस्ते खुले करणे, सेवा वाहिन्या, खांब बाजूला काढणे यासह इतर सूचना केल्या आहेत.
गणेश खिंड रस्त्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावर सुमारे ८ हजार कोटीचा २३ किलोमीटर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या मार्गात विद्यापीठ चौकात उड्डाणपूल चुकल्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होत होती, त्यामुळे गेल्यावर्षी हा उड्डाणपूल पाडण्यात आला. मेट्रो प्रकल्प करताना शिवाजीनगर ते विद्यापीठ चौक या रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावणार आहे. तर पहिल्या मजल्यावरून अन्य वाहने धावतील. तसेच भुयारी मार्गाची रचना करण्यात आली.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध तसेच पिंपरी-चिंचवड भागातून या पुण्यात नागरिक येताना पुणे विद्यापीठात ही वाहतूक एकत्र येते. तसेच शहराच्या बाहेर जाताना देखील या चौकात यावे लागते. हे काम सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने रस्ता वापरता येणार नसल्याने या चौकासह परिसरातील प्रमुख रस्त्यावर पुढील काही महिने वाहतूक कोंडी होणार आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरू असताना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या पथ, वाहतूक नियोजन, प्रकल्प, सांडपाणी, पाणी पुरवठा, भूसंपादन, मालमत्ता व्यवस्थापन या विभागांना समन्वय ठेवून हे काम करावे करावे लागणार आहे.
विभागीय आयुक्तांनी दिल्या या सूचना
- पुणे विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक या रस्त्याच्या डाव्या बाजूने सुमारे २५० मिटर रस्त्याचे विकास आराखड्यानुसार रुंदीकरण आवश्यक
- यासाठी जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया करावी.
- याच्याशी संबंधित विभाग किंवा संस्थांशी समन्वय ठेवून रस्ते खुले करावेत.
- सेनापती बापट चौकातून धोत्रे चौकातून वाहने उजव्या बाजूला वळण्यासाठी मेरियट हॉटेल समोरील दुभाजक कमी करावा. या भागातील माहितीचे फलक काढून टाकावेत
- संगन्ना धोत्रे पथ व अभिमानश्री पथ येथे नो पार्किंग करावे
- मंजूर करण्यात आलेल्या दोन वर्तुळाकार मार्गात वळणावरील अतिक्रमण काढून टाकावे.
- सेनापती बापट चौकातील मेरिएट हॉटेलपुढील दुभाजक काढून टाकावेत.
- रस्ता रुंदीकरणास व वाहतूक अडथळा ठरणारे विद्युत खांब, सीसीटीव्ही खांब, दिशादर्शक फलक काढावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.