पुणे - हवाईदलाची ताकद व क्षमता सिद्ध करत तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ सेवेत असलेल्या मिग-२१ ताफ्यातील सर्व विमानांच्या उड्डाणांना तात्पुरते थांबविण्याचा निर्णय हवाईदलाने घेतला. दरम्यान, पर्यायी लढाऊ विमानांची कमतरता, मंजूर असलेल्या संखेच्या तुलनेत विमानांची कमी संख्या अशा विविध कारणांमुळे या विमानाचा वापर अद्याप सुरू आहे. ही समस्या सोडविण्यासाठी विमानांची देशांतर्गत निर्मिती, तसेच खरेदी प्रक्रिया व विमानांना सेवेतून बाह्य करण्यासाठी योग्य नियोजन आखण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
याबाबत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी सांगितले, ‘‘मिग-२१ ची रचना, क्षमता, वैशिष्टे पाहता हे विमान खूप चांगले आहे. पण हे एक मशिन आहे व त्याला देखील एक मर्यादा आणि विशिष्ट कालावधी असतो, हे विसरून चालणार नाही. यासाठी एक विशिष्ट प्रक्रियेनुसार काम करण्याची गरज आहे. त्यामध्ये हवाईदलात नव्याने दाखल होणारे लढाऊ विमान, सेवेतून कालबाह्य होण्याच्या स्थितीत असलेली विमाने व या दोन्हींमधील कमतरतेला भरण्यासाठी सेवेत काही काळाचा अनुभव असलेले विमान, या चक्राप्रमाणे नियोजन आखण्याची गरज आहे. तरच विमानांच्या तुटवड्याला भरणे व हवाईदलाची क्षमता व ताकद राखण्यास मदत होईल.’
हवाईदलात दाखल झाल्यापासून आजवर मिगच्या अनेक आवृत्त्यांचा वापर झाला आहे. त्यात आवश्यकतेनुसार बदल करत त्यास अद्ययावत करण्यात आले आहे. त्यानुसार वैमानिक प्रशिक्षण घेत इतर नवीन वैमानिकांना ही प्रशिक्षण देत होते. शेवटी विमान तेच मात्र त्यातील प्रणाली व काही घटक वेगळे असल्याने ते आत्मसात केले जात होते. खरंतर या विमानांनान पूर्वीच सेवेतून बाह्य करण्याची वेळ आली होती.
परंतु पर्यायी विमान, त्यांची संख्या या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मिग विमानांचा वापर सुरू आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या मिग विमानाच्या अपघातामुळे आता या विमानांच्या उड्डाणास तात्पुरते थांबविण्यात आले आहे. परंतु या विमानांची सेवा बंद करण्यात आली, तर हवाईदलाच्या स्क्वॉड्रनची संख्या ही कमी होईल, असेही निवृत्त अधिकाऱ्यांनी नमूद केले.
अजूनही सेवेत का?
संरक्षणावरील संसदीय स्थायी समितीच्या अहवालानुसार हवाई दलाला मंजूर झालेली किंवा अपेक्षित संख्येपेक्षा प्रत्यक्षात सेवेत असलेल्या विमानांची संख्या कमी आहे. त्यात नवीन लढाऊ विमानांच्या समावेशात विलंब झाल्यामुळे भारतीय हवाई दलाला ‘मिग’ला अधिक काळ सेवेत ठेवण्यात आले. नव्या लढाऊ विमानांना होत असलेल्या विलंबामुळे विशिष्ट स्क्वाड्रन संख्या राखण्याची ही समस्या आहे. त्यात स्वदेशी लढाऊ विमान तेजसच्या निर्मितीत संत गतीने होत असून राफेल विमानाच्या कराराशी निगडित राजकीय वाद. या सर्व कारणांमुळे ‘मिग’ हा पर्याय कायम ठेवण्यात आला.
या पूर्वी देखील अशा प्रकारे विमानांच्या उड्डाणांना तुर्तास थांबविण्याचा निर्णय हवाईदलात घेण्यात आला आहे. ही एक मानक प्रक्रिया असून जेव्हा एखाद्या प्रकारच्या विमानांच्या अपघात होतात. तेव्हा त्यामागचे कारण काय हे पाहण्यासाठी हे निर्णय घेतले जातात. त्यामध्ये विमान कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड, वैमानिकाकडून झालेली चूक किंवा नैसर्गिक कारण अशा सर्व घटकांची पाहणी केली जाते. जर विमानातील उपकरणे किंवा भागामध्ये बिघाड आढळले तर ते इतर विमानांमध्ये ही आहेत का हे निश्चित करत त्यामध्ये सुधारणा केली जाते.
- ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी (निवृत्त)
नेमकी अडचण काय?
अपेक्षित संख्यांच्या तुलनेत प्रत्यक्षात असलेली लढाऊ विमानांची संख्या कमी
आत्मनिर्भर अंतर्गत नव्या विमानांचे उत्पादन संत गतीने
त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजेच स्वदेशी हलके लढाऊ विमान ‘तेजस’ला होत असलेला विलंब
विमानांच्या खरेदी प्रक्रियेचा कालावधी
अपेक्षित संख्येपेक्षा स्क्वॉड्रनची संख्या कमी
टप्प्या टप्प्याने मिग-२१ बंद झाल्यावर स्क्वॉड्रनची संख्या कमी होणार
प्रशिक्षण विमानांचा ही तुटवडा
वैमानिक प्रशिक्षण, विमानांची खरेदी यासाठीचा खर्च
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.