मेंगडेवाडीमध्ये श्रमदानातून वृक्षारोपण

५०० रोपांचे व १००० बियाचे बिजारोपण
Plantation of trees in Mengdevadi through laborsaving
Plantation of trees in Mengdevadi through laborsaving
Updated on

पारगाव - मेंगडेवाडी, ता. आंबेगाव येथील गण्याडोंगर परिसरात ॲक्रीटेक सोल्यूशन्स (पुणे) आणि वटवृक्ष मेंगडेवाडी एक हरित चळवळ ग्रुप यांच्या सयुंक्त विद्यमाने विविध प्रकारच्या देशी ५०० रोपांचे वृक्षारोपण व १००० बियाचे बिजारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणुन जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, पोलिस निरीक्षक सतीश होडगर, जीवन माने, महेश थिटे, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी जयश्री पवार, संतोष बिराजदार, वनविभागचे दशरथ मेंगडे, पोलिस पाटील नितीन मेंगडे व ॲक्रीटेक सोल्यूशन्सचे समीर सोळसे व गणेश मांदळे व कंपनीचा पूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

वटवृक्ष मेंगडेवाडी ग्रुपच्या कामाचे कौतुक करत आजुबाजूच्या गावांनी सुद्धा यातून प्रेरणा घेऊन वृक्षारोपण करून धरनी मातेच्या सेवा करावी असे मत पोलीस निरीक्षक श्री. होडगर यांनी व्यक्त केले. तसेच यावेळेस वटवृक्ष मेंगडेवाडी ग्रुपचे सभासद व मेंगडेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रस्ताविक ग्रामसेवक जयंवत मेंगडे यांनी केले तसेच ग्रुपचे उपाध्यक्ष सतीश मेंगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()