Plastic Bag : प्लास्टिक पिशव्यांचा फेरवापर; पर्यावरण संवर्धनासाठी ‘स्टार्टअप’चा पुढाकार

पुणे शहरात विविध ब्रँडच्या दुधाच्या पिशव्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वापरातून दररोज अंदाजे ३० हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो.
Plastic-bag
Plastic-bagsakal
Updated on
Summary

पुणे शहरात विविध ब्रँडच्या दुधाच्या पिशव्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वापरातून दररोज अंदाजे ३० हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो.

पुणे - पुणे शहरात विविध ब्रँडच्या दुधाच्या पिशव्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वापरातून दररोज अंदाजे ३० हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा कमी करीत पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पुण्यातील एका स्टार्टअपने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वापरून स्वच्छ केलेल्या दुधाच्या प्लास्टिक पिशव्या हे स्टार्टअप ग्राहकांकडून फेरवापरासाठी जमा करीत आहे.

या स्टार्टअपने एकूण वापरातील सुमारे ३० टक्के पिशव्यांचा फेरवापर केला आहे. त्यासाठी कंपनीने प्रो-अर्थ या सामाजिक संस्थेशी करार केला आहे. ए २ डेअरी स्टार्टअप ‘ट्रुली देसी’ असे या स्टार्टअपचे नाव आहे. याबाबत स्टार्टअपचे सह-संस्थापक मोहित राठोड यांनी सांगितले, ‘‘देशात दररोज सुमारे पाच कोटी दुधाच्या पिशव्या कचऱ्यात जातात. या पिशव्यांचे विघटन होण्यासाठी सुमारे ४०० वर्षांचा काळ लागतो. तोपर्यंत त्या जमिनीत तशाच राहतात. त्यातून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आम्ही या पिशव्यांचे संकलन आणि दुधासाठी फेरवापर करण्याचा उपक्रम हाती घेतला. आमच्या ब्रँडच्या दुधाच्या पिशव्याही त्यात असतात. सध्याचे या कामाचे स्वरूप छोटे असले तरी लवकरच त्याची व्याप्ती वाढवून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा फेरवापर केला जाईल. त्यातून अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल.

पिशव्यांचे कोपरेही करतात कचरा

महिन्याच्या शेवटी, डिलिव्हरी एजंट या पिशव्या गोळा करतात आणि त्यांचा फेरवापर करण्यासाठी प्रो-अर्थकडे पाठवतात. दूध ओतण्यासाठी दुधाच्या पिशवीचे कोपरे पूर्ण कापून न टाकता, थोडासा भाग कापून त्यातून दूध ओतून घ्यावे. कारण यामुळे असे प्लास्टिक पिशव्यांचे कोपरेही मोठा कचरा निर्माण करतात, अशी माहिती स्टार्टअपकडून देण्यात आली.

प्रो-अर्थ हा एक हरित उपक्रम आहे. काच, प्लास्टिक, ई-कचरा, पुठ्ठा इत्यादी साहित्य एकत्र करून ते रि-सायकलकडे पाठविण्याचे काम आम्ही करतो. पर्यावरणाबाबत नागरिक आता अधिक जागरूक होत आहेत. मात्र, ते प्रत्यक्ष कृतीतून दिसून येणे महत्त्वाचे आहे. फेरवापर करता येण्याजोग्या कचऱ्यासाठी पारदर्शक मूल्य साखळी तयार करण्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही कोणालाही त्यांची जीवनशैली आणि सवयी बदलण्यास सांगतो, तेव्हा आम्हाला पूरक उपाय पुरवणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही ट्रुली देसी यांच्यासोबत काम करीत आहोत.

- हम्सा अय्यर, महाव्यवस्थापक, प्रो-अर्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.