Plastic Surgery Day : अन्‌ चेहऱ्यावरच्या सुरकुत्या झाल्या गायब

‘वयाची चाळिशी ओलांडलेली. पण, वयाच्या तुलनेत चेहऱ्यावर फारच सुरकुत्या दिसू लागल्या. वेगवेगळ्या क्रिम्स, लोशन्स वापरली. पण, सैल झालेली त्वचेवर फारसा परिणाम होत नव्हता.
wrinkles on the face
wrinkles on the facesakal
Updated on

पुणे - ‘वयाची चाळिशी ओलांडलेली. पण, वयाच्या तुलनेत चेहऱ्यावर फारच सुरकुत्या दिसू लागल्या. वेगवेगळ्या क्रिम्स, लोशन्स वापरली. पण, सैल झालेली त्वचेवर फारसा परिणाम होत नव्हता. स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ बघताना मनाला त्रास होऊ लागला. अकाली वार्धक्य जाणवू लागल्याने कामातील उत्साह कमी झाला. यातून मार्ग काढण्यासाठी अखेर चेहऱ्यावरील सुरकुत्या काढण्याची शस्त्रक्रिया केली,’’ संगणक अभियंता असलेल्या अपूर्वा हसबनीस बोलत होत्या.

प्लॅस्टिक सर्जरी दिन सोमवारी साजरा होत आहे. या क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे राजकीय, शैक्षणिक, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांना मोठा फायदा होत आहे. त्या निमित्ताने हसबनीस यांनी त्यांचा अनुभव ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.

त्या म्हणाल्या, ‘परदेशातील ग्राहकांशी कंपनीतर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलताना संगणकाच्या पडद्यावर चेहऱ्यावरील सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. चेहऱ्याच्या माध्यमातून पडणारा प्रभाव स्वतःलाच जाणवत नव्हता. त्यामुळे प्लॅस्टिक सर्जरीचा निर्णय घेतला.’

तुटलेला अवयव परत जोडणे

प्लॅस्टिक सर्जरीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे तुटलेला अवयव परत जोडणे. हात, बोटं, कान, पाय असे अवयव तुटल्यास ते रुग्णाच्या शरीरावर परत जोडण्याचे कौशल्य आणि तंत्र आधुनिक वैद्यकशास्त्रात विकसित झाले आहे. त्याचा फायदा शहरांबरोबरच ग्रामीण भागात काम करताना झालेल्या अपघातातील रुग्णांनाही झाला आहे. त्यांचा तुटलेला अवयव परत जोडण्यात यश मिळाले असल्याचेही डॉ. सुळे यांनी स्पष्ट केले.

प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे काय?

या बाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जन शौनक सुळे म्हणाले, ‘‘प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे सुघटन शल्यचिकित्साशास्त्र. शरीरातील विविध अवयवांची विद्रुपता कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. जन्मतः दुभंगलेले टाळू, ओठ, कर्करोग शस्त्रक्रियेनंतर आलेली विद्रुपता किंवा संसर्गामुळे, अपघातामुळे निर्माण झालेल्या व्यंग दूर करण्यासाठी ही शस्त्रक्रिया प्रभावी ठरते.’’

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकालाच सुंदर दिसायचे असते. पण, त्यासाठी आवश्यक जागृती असणे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन टाळून तरुणांनी त्यात नियमित व्यायाम, योग्य आहार यावर भर दिला पाहिजे. त्यातून शरीर नैसर्गिकपणे सुडौल आणि तंदुरुस्त राहील. प्लॅस्टिक सर्जरी ही कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर चेहरा जबडा, किंवा इतर अवयव पूर्ववत करण्यासाठीही वापरता येते.

- शौनक सुळे, प्लॅस्टिक सर्जन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.