Pune News : प्लॉट, प्लिंथ सोसायट्यांचा पुनर्विकास शक्य

बंगला, प्लॉट व प्लिंथ सोसायटी पुनर्विकासासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या रविवारी माहितीपूर्ण परिसंवादात सहभागी होण्याची संधी.
Redevelopment Forum
Redevelopment Forumsakal
Updated on

पुणे - बंगला, प्लॉट व प्लिंथ सोसायटी पुनर्विकासासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी `सकाळ रिडेव्हलपमेंट फोरम व एस. के. फॉर्च्युन ग्रुप`, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था-अपार्टमेंट महासंघ यांच्यातर्फे येत्या रविवारी (ता. १०) सकाळी वाजता विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

यात सोसायट्यांच्या पदाधिकारी, सदस्यांना पुनर्विकास क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. १९५० ते ८० या कालावधीत दोन प्रकारच्या सोसायट्यांची निर्मिती झाली.

प्रकार - १) जमिनीच्या मोठ्या तुकड्यांचे प्लॉट पाडून व त्यावर कंत्राटदाराकडून बांधलेल्या बंगल्यांची सोसायटी हा एक प्रकार आहे.

२) दोन हजार, तीन हजार चौरस फुटांचे प्लिंथ बनवून त्यावर घरांची उभारणी होते. त्यास प्लिंथ सोसायटी म्हणून ओळखले जाते. प्लिंथच्या आकारानुसार संबंधित जागा वा घरमालकाला सोसायटीतील शेअर मिळतात.

असे आहेत घरमालक व सोसायट्यांचे काही ठळक प्रश्न

  • लहान रस्त्यांवर असणाऱ्या सोसायटी व सोसायटीत प्लॉटच्या आकारानुसार मिळणाऱ्या एफएसआयमधील तफावत

  • देखभाल दुरुस्तीसाठी निधीची कमतरता

  • सोसायटीत एकोप्याची उणीव

  • वैयक्तिक व कौटुंबिक वादापोटी निर्माण झालेले अडथळे

  • सोसायटी व शासन स्तरावर प्रॉपर्टीच्या अपूर्ण नोंदी

  • घरे व सोसायटींशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची अनुपलब्धता

  • जुन्या व नव्या डीपीतील नोंदीमधील तफावत

मोठ्या प्लॉट व प्लिंथ सोसायट्यांची आजची स्थिती लक्षात घेता रस्त्यालगत असलेल्या प्लॉटधारकांना आवश्यकतेनुसार बदल वा वापर करता येत नाही. काही ठिकाणी सोसायटी, तर काही ठिकाणी घरमालकांच्या वेगवेगळ्या भूमिका, मनमानीमुळे वाद होतात. काही ठिकाणी निधी कमी असते. सोसायट्यांकडून बनविले जाणारे नियमही काही ठिकाणी वादाची कारणे ठरतात. त्यावर शासनाचे नियंत्रण असावे. या सर्वांवर एकत्रित विचार करून पुनर्विकास शक्य आहे. गरज आहे ती सकारात्मक विचार अन् कृतीची.

- विकास अचलकर, वास्तुविशारद

काळाच्या प्रवाहात जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकासही आवश्यक बाब आहे. प्लॉटधारकांनी, घरमालकांनी आपल्या भूमिकांमध्ये बदल केल्यास व आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियांच्या मदतीने पुनर्विकास शक्य आहे. त्यातून सोसायटीच्या पुनर्विकासासह सर्वांना सुविधासंपन्न घरे मिळू शकतील.

- मनोज तातुस्कर, वास्तुविशारद

बहुविध प्रश्नांनी घेरलेल्या सोसायट्या व घरमालकांना पुनर्विकास करणे शक्य आहे. त्यांच्या मदतीसाठी हा विशेष परिसंवाद आहे. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आयोजित अशा उपयुक्त विशेष परिसंवादाचा सोसायट्या व सभासदांनी लाभ घेणे आवश्यक आहे.

- सुहास पटवर्धन अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघ

प्लॉट व प्लिंथ सोसायट्यांना पुनर्विकास करताना किती प्राप्तीकर भरावा लागेल? जीएसटी भरावा लागेल का? महारेराच्या नियमावलीचे काय? या सारखे असंख्य प्रश्न जागामालक व सोसायटीसमोर येतात. या बद्दलच्या कायद्यातील तरतूदी क्लिष्ट व गुंतागुंतीच्या आहेत. या बाबत अभ्यासपूर्ण व योग्य रीतीने पुनर्विकासाची योजना राबवल्यास सर्व प्रश्नांवर तोडगा काढणे शक्य आहे.

- प्रवीण बांगर, सीए

नोंदणी आवश्यक

या विशेष परिसंवादात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. बंगला व प्लॉटबाबत आपल्या सोसायटीशी संबंधित प्रश्न ८०८०९४९८४६ या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावे लागतील. सोबतचा क्यू-आर कोड स्कॅन करून फॉर्म भरता येईल. परिसंवादात सहभागी तज्ज्ञ निवडक प्रश्नांना उत्तरे देतील. नावनोंदणी करताना बंगला व प्लॉट सोसायटीचे नाव, दोन पदाधिकाऱ्यांची नावे व फोन नंबर हा तपशील लागेल.

  • बंगला, प्लॉट व प्लिंथ सोसायटी पुनर्विकासावर विशेष परिसंवाद

  • ठिकाण : बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड

  • तारीख : रविवार , १० सप्टेंबर २०२३

  • वेळ : सकाळी १० ते दुपारी १

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()