PM Fasal Bima Yojana: गुड न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांना यंदाही मिळणार एका रुपयात पीक विमा; या तारखेपर्यंत करा अर्ज

Dhananjay Munde: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा, येत्या १५ जुलैपर्यंत अर्ज करणे अनिवार्य
PM Fasal Bima Yojana: गुड न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांना यंदाही मिळणार एका रुपयात पीक वीमा
PM Fasal Bima Yojanasakal
Updated on

Pune : राज्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचाही केवळ एक रुपयांत पीकविमा उतरविता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरु केलेल्या ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ या योजनेची यंदाच्या खरीप हंगामातही अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी खात्याने घेतला आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी येत्या १५ जुलैपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. या पीकविमा योजनेचा राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

PM Fasal Bima Yojana: गुड न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांना यंदाही मिळणार एका रुपयात पीक वीमा
Agro Vision : संत्रा निर्यातीला ५० टक्के अनुदान - देवेंद्र फडणवीस

केंद्रपुरस्कृत पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील (२०२३-२४) पिकांसाठी पहिल्यांदा ही ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’( कप ॲण्ड कॅप मॉडेल ८०:११०) राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती. या विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास करणे आणि स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे.

सध्या ही योजना केवळ अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. ती ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे.

PM Fasal Bima Yojana: गुड न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांना यंदाही मिळणार एका रुपयात पीक वीमा
PM Surya Ghar Yojana : हर घर सोलर पॅनेल; देशातील 1 कोटी लोकांना मिळणार ३०० युनिटपर्यंत वीज मोफत

या नुकसानींची भरपाई मिळणार

- हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान

- पिकांच्या हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान

- पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतील नैसर्गिक आग

- वीज कोसळणे, गारपीट

- वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पीकक्षेत्र जलमय होणे (भात, ऊस व ताग पीक वगळून)

- भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट

- स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान

- नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान

या विमा योजनेतील समाविष्ट पिके

भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस, सोयाबीन, कांदा.

PM Fasal Bima Yojana: गुड न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांना यंदाही मिळणार एका रुपयात पीक वीमा
PM Kisan Yojana: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' तारखेला खात्यात येणार दोन हजार रुपये

अर्ज कोठे कराल?

या पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा, यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र पीक विमा पोर्टल सुरु केले आहे. विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी केवळ १ रुपया भरून हा पीक विमा उतरविणे गरजेचे आहे. इच्छुक शेतकऱ्यांना www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.

PM Fasal Bima Yojana: गुड न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांना यंदाही मिळणार एका रुपयात पीक वीमा
PM Surya Ghar Yojana: PM मोदींनी सुरू केली 'पीएम सूर्य घर' योजना, आता दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.