PM Modi Pune Visit : दगडूशेठ मंदिरात पूजा ते मेट्रोला हिरवा झेंडा; PM मोदींच्या दौऱ्यात पुणेकरांना मिळणार 'ही' खास भेट

PM Modi Modi visit Pune 1st August Dagdusheth Mandir darshan Lokmanya Tilak Award metro development projects
PM Modi Modi visit Pune 1st August Dagdusheth Mandir darshan Lokmanya Tilak Award metro development projects esakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत. तसेच पंतप्रधान मोदी हे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिरात दर्शन घेऊन पूजा देखील करणार आहेत. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी (३० जुलै) दिलेल्या निवेदनात याबद्दल माहिती दिली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोच्या पहिल्या दोन कॉरिडॉरच्या पूर्ण झालेल्या सेवेच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ही मेट्रो फुगेवाडी स्टेशन ते सिव्हिल कोर्ट स्टेशन आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन पर्यंत राहणार आहे.

2016 मध्ये पंतप्रधानांनी या प्रकल्पाची पायाभरणीही केली होती. नवीन टप्पा सुरू झाल्याने पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्टेशन यासारखी महत्त्वाची ठिकाणे जोडली जातील.

PM Modi Modi visit Pune 1st August Dagdusheth Mandir darshan Lokmanya Tilak Award metro development projects
Sambhaji Bhide Controversy : भिडेंवर कठोर कारवाई का होत नाही? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

पंतप्रधान मोदी या दौऱ्या वेळी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत PCMC ने बांधलेली 1,280 हून अधिक घरे देखील सुपूर्द करतील. तसेच ते पुणे महानगरपालिकेने बांधलेली 2,650 पीएमएवाय घरे देखील सुपूर्द करतील. याशिवाय, PCMC द्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1,190 पीएमएवाय घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे बांधण्यात येणार्‍या 6,400 हून अधिक घरांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

PM Modi Modi visit Pune 1st August Dagdusheth Mandir darshan Lokmanya Tilak Award metro development projects
Kolhapur Flood : 'शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरातील पूर टळला'; मंत्री केसरकरांचं वक्तव्य चर्चेत

या पुणे दौऱ्यात पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळकांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने 1983 मध्ये या पुरस्काराची स्थापना केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.