PM Modi In Pune : हातात छत्री चेहऱ्यावर हास्य..; पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत

PM Modi In Pune
PM Modi In PuneeSakal
Updated on

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी हातात छत्री घेऊन मोदी विमानातून उतरले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आगमनानंतर पंतप्रधान पहिल्यांदा पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते एसपी कॉलेज येथे पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

PM Modi In Pune
PM Modi Pune Visit : मोदींच्या पुणे दौऱ्याची सुरूवात गणपती दर्शनाने! दगडूशेठ मंदिरात जय्यत तयारी

पंतप्रधान मोदी आज पुण्यातील मेट्रोचे लोकार्पण तसेच पंधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या हजारो घरांचे हस्तांतरण करणार आहेत. या दरम्यान मोदींच्या या दौऱ्यादरम्यान काँग्रेससह अनेक सामाजिक संस्थांकडून मोदींच्या दौऱ्याचा निषेध करत आंदोलन केले जात आहे. विरोधकांकडून पंतप्रधानांना मणिपूरच्या मुद्द्यावर काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत.

PM Modi In Pune
PM Modi in Pune : "गांधीजींचे अन् लोकमान्यांचे तात्विक मतभेद झाले पण..."; राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()