PM Modi Pune Visit: 'मोदी गो बॅक', 'मणिपूरवर बोला'; काँग्रेस, सामाजिक संघटनांकडून पुण्यात निषेध आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
PM Modi Pun Visit
PM Modi Pun Visit
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दोन मेट्रो मार्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

पण मोदींच्या या दौऱ्याला पुण्यातील विविध सामाजिक संघटना तसेच काँग्रेसच्यावतीनं विरोध करण्यात येत आहे. काळ कपडे परिधान करत तसेच काळे झेंडे दाखवत मोदींना जोरदार विरोध दर्शविण्यात येत आहे. (PM Modi Pune Visit Modi Go Back Talk on Manipur Protest by Congress social organizations in Pune)

PM Modi Pun Visit
LPG Cylinder Price: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी! 100 रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर

काँग्रेससह इंडिया फ्रन्टच्यावतीनं युक्रांद, हमाल पंचायत आणि तर सामाजिक संघटनांनी महात्मा फुले मंडई परिसरात सकाळपासून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोधात करण्यात येत आहे. कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काळे फ्लेक्स परिधान करत आंदोलन केलं. यावेळी त्यांनी 'मोदी गो बॅक'च्या घोषणाही दिल्या. तसेच 'मन की बात मत करो, काम की बात करो' असे फलक दाखवण्यात आले.

PM Modi Pun Visit
Sharad Pawar Narendra Modi Friendship : मोदींसोबत शरद पवारांची मैत्री कधी झाली ? पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच..

युक्रांदचं आंदोलन

दरम्यान, दुसरीकडं सामाजिक संघटनांच्यावतीनं देखील मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हातात पोस्टर घेऊन त्यांचा निषेध नोंदवला. यावेळी युक्रांदचे प्रमुख कुमार सप्तर्षी म्हणाले, "लोकमान्यांचं नाव मोदींच्या नावाला चिकटवणं हे गैर आहे. लोकमान्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट अशी की, लोकशाहीचे कुठलेही संकेत ते पाळत नाहीत. लोकसभेत ते येत नाहीत, बोलत नाहीत. मणिपूर जळत होतं, त्यांनी त्यावरही काही केलं नाही. त्यामुळं त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे"

PM Modi Pun Visit
PM Modi Pune Visit : मोदींच्या पुणे दौऱ्याची सुरूवात गणपती दर्शनाने! दगडूशेठ मंदिरात जय्यत तयारी

निषेध झालाच पाहिजे - सप्तर्षी

मोदींच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हीच हुकुमशाहीची चाहूल आहे. यालाच आमचा विरोधात आहे, हिटरल येण्यापूर्वी असंच होतं. आमच्या युक्रांदला पोलिसांच्या नोटीसा आल्या काही कार्यकर्त्यांना रात्रीत पोलिसांनी अडवून ठेवलं आहे. त्यांच्या हातात पकडणं आहे, आमच्या हातात निषेध करणं आहे. निषेधचं झाला नाहीतर पुढे काहीच शिल्लक राहणार नाही, असं यावेळी सप्तर्षी यांनी म्हटलं आहे.

PM Modi Pun Visit
Prithviraj Chavan : 'मुद्दाम कोणीतरी तेलात काडी टाकतंय, तरुण मुलांची डोकी भडकवणाऱ्या भिडेंनी त्यांचं नाव का बदललं?'

लोकमान्य म्हणाले होते आम्हाला सुराज्य नको, स्वराज्य हवं तीच परिस्थिती सध्या सुरु आहे. देशात धर्मद्वारे द्वेषाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं आपला देश विघटनाच्या दिशेनं झाला आहे, त्याच भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आज आम्हाला संधी आहे. त्यामुळं हे आंदोलन करण्यात येत आहे, असं यावेळी अन्वर राजन यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.