PM Modi Pune Visit: यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मोदींनी लोकमान्यांची महती कथन केली. तसेच त्यांचं गुजरातचं कनेक्शनही सांगितलं. हे कनेक्शन सांगताना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचाही उल्लेख केला. (PM Modi Pune Visit Modi told Lokmanya Tilak Gujarat connection in Pune Programme)
मोदी म्हणाले, "तसं तर लोकमान्य टिळक हे संपूर्ण भारताचे लोकमान्य नेते आहेत. पण पुणे आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी त्यांचं एक खास स्थान आहे. तसंच गुजरातच्या लोकांचंही त्यांच्याशी खास नातं आहे. या निमित्तानं मला या नात्याची आठवण सांगावी वाटते की, स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी टिळक सुमारे दीड महिना अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात होते. यानंतर १९१६ मध्ये टिळक अहमदाबादमध्ये आले. त्यावेळी इंग्रजांकडून जुलूम केले जात होते. तेव्हा ४०,००० हून अधिक लोक टिळकांच्या स्वागतासाठी आले होते.
आणखी आनंदाची बाब म्हणजे त्यांना ऐकण्यासाठी श्रोत्यांमध्ये सरदार वल्लभभाई पटेलही होते. त्यांच्या भाषणानं सरदार पटेल यांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली. त्यानंतर सरदार पटेल हे अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष बनले. त्यावेळी त्यांनी अहमदाबादमध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. पुतळा बसवण्यामध्ये त्यांच्यातील लोहपुरुषाची झलक दिसून येते.
यावेळी हा पुतळा बसवण्यासाठी त्यांनी जी जागा शोधली ती म्हणजे व्हिक्टोरिया गार्डनं. इंग्रजांनी राणी व्हिक्टोरियाचा हिरक महोत्सव साजरा करण्यासाठी अहमदाबादमध्ये सन १८९७ व्हिक्टोरिया गार्डनची स्थापना केली. म्हणजेच इंग्रजांनी बनवलेल्या त्यांच्या राणीच्या गार्डनमध्ये टिळकांचा पुतळा बसवण्याचा निर्णय पटेलांनी घेतला. यावेळी सरदार पटेल यांच्यावर खूप मोठा दबाव होता.
यावर आपण पद सोडण्यास तयार आहोत पण टिळकांचा पुतळा तिथेच बसवण्यात येईल यावर ते ठाम होते. पुढे सन १९१९मध्ये त्या पुतळ्याचं उद्घाटनं महात्मा गांधींच्या हस्ते झालं. मी अनेकदा या गार्डनमध्ये गेलो आहे तिथं मला टिळकांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं. या गार्डनमध्ये टिळकांचा पुतळा विश्राम मुद्रेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.