PM Modi Pune Visit: सिव्हिल कोर्टवरुन स्वारगेटला किती मिनिटांत पोहचणार? पंतप्रधान करणार अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन

Civil Court To Swargate Underground Metro: नवीन भूमिगत मेट्रो मार्गामध्ये आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाठी अनेक आधुनिक सुविधांचा समावेश आहे. यात आधुनिक स्थानके, सुरक्षा आणि आरामदायी प्रवास यांचा समावेश आहे.
Civil Court To Swargate Underground Metro
Civil Court To Swargate Underground MetroEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर 2024 रोजी पुण्याच्या नवीन भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन करतील. दिवाणी न्यायालय ते स्वारगेटपर्यंत धावणाऱ्या या मेट्रो मार्गामुळे शहराच्या कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. याबरोबर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी दोन मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार आणि पिंपरी चिंचवड ते निगडी असा कॉरिडॉर यांचा समावेश आहे.

या दोन्ही नव्या प्रकल्पांमुळे पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणखी सुधारणा होणार आहे. यासह पुणेकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.

नवीन भूमिगत मेट्रो मार्गामध्ये आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाठी अनेक आधुनिक सुविधांचा समावेश आहे. यात आधुनिक स्थानके, सुरक्षा आणि आरामदायी प्रवास यांचा समावेश आहे.

दिवाणी न्यायालय ते स्वारगेत मार्गावरील भूमिगत मेट्रो ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित आहेत. तसेच मेट्रोची रचना प्रत्येक प्रवाशाला लक्षात घेऊन केली गेली आहे, ज्यामध्ये रॅम्प आणि दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळ्या जागेची व्यवस्था केली आहे. याचबरोबर पुण्यातील हा नवा मेट्रो मार्ग पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे.

सिव्हिल कोर्टवरुन स्वारगेटला किती मिनिटांत पोहचणार?

दिवाणी न्यायालय आणि स्वारगेट दरम्यानचा प्रवास वेळ फक्त 10-12 मिनिटांचा असण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.

हा नवीन मेट्रो मार्ग पुण्यातील प्रमुख भागांना जोडतो, ज्यामुळे लोकांना संपूर्ण शहरात प्रवास करणे सोपे होईल.

भूमिगत पुणे मेट्रोच्या शुभारंभामुळे शहरातील रहिवाशांना मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल आणि दैनंदिन प्रवासाचा वेग वाढेल.

Civil Court To Swargate Underground Metro
Pune Road Condition :राष्ट्रपती कार्यालयाने टोचले महापालिकेचे कान; पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे दुरुस्तीच्या सूचना

दरम्यान दिवाणी न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रोबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 26 सप्टेंबरला होणार आहे. यावेळी ते स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा विस्तार आणि पिंपरी चिंचवड ते निगडी असा एलिव्हेटेड मार्गाच्या कामाचे भूमिपूजनही करणार आहेत."

Civil Court To Swargate Underground Metro
Sharad Pawar: 1 जागा अन् तिन्ही पक्षांना लढवायची असेल तर..? शरद पवारांनी सांगितली रणनीती, अंतिम उमेदवारांची घोषणा कधी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.