पुणेकरांच्या ‘केअर’साठी आता गल्लीबोळात ‘सेंटर’

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महापालिका घेणार खासगी डॉक्टरांकडून मदतीचा हात
PMC Pune Covid care Center near house in Pune
PMC Pune Covid care Center near house in Pune Team Esakal
Updated on

पुणे : श्‍वास रोखला जातोय, बेड हवा आहे, हॉस्पिटलच्या दारात रांग लागलीय, तरीही कुठे बेड मिळेना; बेड असले तरी डॉक्टर नाहीत. कोरोनाच्या साथीत उभे राहिलेल्या या संकटावर मात करीत, गल्लीबोळात म्हणजे, शक्य तिथे कोविड केअर सेंटर उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. खासगी डॉक्टरांना एकत्र आणून ही सुविधा उभारली जातेय. त्यासाठी रुग्णांवरील उपचाराचा खर्च करण्याची तयारी महापालिकेची आहे. तेव्हा डॉक्टरांनो एकत्र या आणि ऑक्सिजन बेडची सुविधा करा. शक्य झाल्यास अतिदक्षता विभाग (आयसीयू) करा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत आरोग्य व्यवस्था अर्थात, बेड कमी पडत आहेत. खासगी, महापालिका आणि अन्य सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड नसल्याने रुणांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्याचवेळी कोरोना रुग्ण, त्यातील अत्यवस्थ आणि मृतांचीही संख्या वाढत आहे. तरीही आरोग्य यंत्रणांवर विस्तारताना महापालिकेपुढे मर्यादा आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर रुग्णांना अगदी घराजवळ उपचार व्यवस्था पुरविण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यात खासगी, संस्था, संघटनांच्या माध्यमातून डॉक्टरांना एकत्र आणण्याचे नियोजन केले आहे.

PMC Pune Covid care Center near house in Pune
दिग्दर्शिका सुमित्रा भावे काळाच्या पडद्याआड

काही कोरोना रुग्णांची प्रकृती अचानक बिघडून त्यांना लगेचच ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याचे दिसत आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत त्यांना बेड मिळत नसल्याने काही रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना घरापासून जवळच्या ठिकाणी कोविड सेंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

असा होणार फायदा

  • रुग्णांना घराजवळ उपचार

  • अत्यवस्थ रुग्णांवर वेळेत उपचार

  • रुग्णांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी नातेवाइकांना सोईस्कर

  • जम्बो, कोविड आणि अन्य रुग्णालयांवरील ताण कमी

  • सेंटरच्या माध्यमातून पुरेसे डॉक्टर उपलब्ध होतील

PMC Pune Covid care Center near house in Pune
पक्ष कार्यालयात बर्थडे करणे 16 जणांना भोवले

''कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्टर आणि अन्य कर्मचारी कमी पडणार नाहीत; यादष्टीने कोविड सेंटर उभारून उपचार व्यवस्था विस्तारण्यात येत आहे. अशा प्रकारचे सेंटर उभारणाऱ्यांना सर्व पातळ्यांवर सहकार्य केले जाईल. त्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे''

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त महापालिका

''मोकळ्या जागा किंवा एखाद्या इमारतीत कोविड सेंटर सुरू करता येणार आहे. त्यासाठी किमान शंभर बेडची सोय करावी लागेल. संस्था किंवा डॉक्टरांच्या ग्रुपने पुढाकार घेऊन सेंटर चालविण्याची व्यवस्था करता येणार आहे. सेंटरमधील पायाभूत सुविधांची महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून पाहणी करून परवानगी दिली जाईल''

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()