Pune News : एक महिला सक्षम झाले की तिचे कुटुंब देखील सक्षम होते. त्यामुळे महिलांमध्ये उद्योजकता वाढावी यासाठी पुणे महापालिका कटिबद्ध आहे. महिलांच्या मागणीप्रमाणे प्रशिक्षणवर्ग, आर्थिक मदत आम्ही करू असे प्रतिपादन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले.
महापालिकेतर्फे सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानामध्ये तीन दिवसीय खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते आज (ता.१९) करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, अशा राऊत, सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, समाजविकास अधिकारी आर. आर. चव्हाण आदी उपस्थित होते. या खाद्यमहोत्सवाचा समारोप रविवारी (ता. २१) होणार आहे.
आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. बचत गटांना मदत केली जाते. शहरात आणखी नव्याने बचतगट स्थापन होऊन महिलांसाठी रोजगार निर्माण झाला पाहिजे.
महापालिकेला बचत गटांना आर्थिक बळ मिळावे यासाठी वर्षभरात १५ ते २० प्रदर्शन, महोत्सव असे कार्यक्रम आयोजित करत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध आहे, त्यामुळे व्यवसाय वाढीला होऊ शकते. महापालिकेच्या महिला, दिव्यांग, युवक आणि मागासवर्गीय घटकासाठी कोणत्या योजना राबवत आहे याची पुस्तिका देखील तायर आहे.
केवळ कपडे विक्री, खाद्यपदार्थ विक्री असे व्यवसाय न करात कार ड्रायव्हिंग क्लासेस, मोबाईल रिपेरिंग, फॅशन डिझायनिंग यासह इतर तांत्रिक ज्ञान असणाऱ्या व्यवसायासाठी प्रशिक्षण देण्याची जबाबदारी महापालिकेची. तुमच्या मागणी प्रमाणे आम्ही व्यवसायांचे प्रशिक्षण, बाजारपेठ उपलब्ध करून देऊ, असेही आयुक्त म्हणाले.
डॉ. खेमनार म्हणाले, ‘‘महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे २२ योजना राबविल्या जातात. महिलांचे आर्थिक उन्नती व्हावी यासाठी महापालिकेकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. व्यवसाय वृद्धीसाठी पंतप्रधान स्वनिधी योजना, लखपती दीदी यासह अन्य योजना आहेत. याचा महिलांनी लाभ घ्यावा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.