Pune : महापालिका वारंवार पाणी बंद का करते ?

जलशुद्धीकरण केंद्र, वीज पुरवठा याची महत्त्वाची भूमिका आहे. यापैकी एका ठिकाणी जरी बिघाड झाली तर त्याचा परिणाम पाणी वितरण व्यवस्थेवर होतो. त्यामुळे बिघाड होण्याच्या आधीच देखभाल दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाते.
water supply scheme
water supply schemeesakal
Updated on

पुणे - पुणेकरांना अपुरा पाणी पुरवठा होत असताना महापालिका वारंवार पाणी बंद का करते? कधी दक्षीण पुण्याचा पाणी पुरवठा बंद, तर कधी पूर्व पुण्याचा पाणी पुरवठा बंद असतो. तर कधी धायरी, कोथरूड पासून ते येरवडा, वडगाव शेरीचा पाणी पुरवठा बंद असतो.

देखभाल दुरुस्तीचे कारण दिले जात असले तरी या काळात नेमके महापालिका काय करते असा प्रश्‍न पुणेकरांना पडतो. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी बंद करून कपात तर केली जात नाही ना अशीही शंका उपस्थित केली जाते. पण प्रशासनाने या शंका विना आधार असून, एकाच वेळी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद न करता टप्प्याटप्प्याने कामे केली जात असल्याने जेथे काम आहे तेवढ्याच भागाचा पाणी पुरवठा बंद असतो, उर्वरित शहराचा पाणी पुरवठा सुरळीत असतो असे स्पष्टीकरण दिले आहे.

पाणी पुरवठा विभागातर्फे खडकवासला धरण प्रकल्पातून १४७० एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १५० एमएलडी असे एकूण १६२० एमएलडी पाणी शहरासाठी घेतले जाते. यापैकी ४० टक्के पाण्याची गळती आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या वितरण व्यवस्थेत जलवाहिनी,

जलशुद्धीकरण केंद्र, वीज पुरवठा याची महत्त्वाची भूमिका आहे. यापैकी एका ठिकाणी जरी बिघाड झाली तर त्याचा परिणाम पाणी वितरण व्यवस्थेवर होतो. त्यामुळे बिघाड होण्याच्या आधीच देखभाल दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाते. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. महापालिकेतर्फे एवढा मोठा खर्च केला जातो.

एकाच दिवशी पाणी बंद टाळले

पूर्वी स्थापत्य आणि विद्युत विषयक कामे एकाच दिवशी शहरातील सर्व जलकेंद्रांवर केली जात होती. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद केला जात होता, त्यामुळे जलवाहिन्या पूर्णपणे रिकाम्या होतात. दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा सुरळीत केला तरी जलवाहिन्यांच्या शेवटच्या टप्प्यातील जो भाग आहे तेथे (टेलएंड) पाणी जात नाही व नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यास किमान दोन ते तीन दिवस लागत असल्याने त्याविरोधात प्रशासनावर रोष व्यक्त केला जातो. नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने एकाच वेळी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद न ठेवता ६ जलशुद्धीकरण केंद्रानुसार नियोजन केले.

त्यामुळे एका जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम सुरू असले तरी उर्वरित शहरात पाणी पुरवठा सुरू राहतो. अशापद्धतीने नियोजन केल्याने महापालिकेतर्फे गुरुवारी पाणी बंद असल्याचे सांगितले जात असले तरी ते केवळ ठराविक भागापुरतेच मर्यादित असते. गेल्या दोन वर्षात सात ते आठ वेळा पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद होता, इतर वेळी ज्या भागात काम आहे तेथेच बंद ठेवण्यात आले होते.

पाणी पुरवठा बंद असण्याची ही आहेत कारणे

- जलशुद्धीकरण केंद्रातील मोटारींची देखभाल दुरुस्ती करणे

- मोटार जळणे

- अचानक विद्युत पुरवठा बंद होणे किंवा फिडरमध्ये खराबी होणे

water supply scheme
Mumbai : अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अभिनेत्रीची तुरुंगातून सुटका! लवकरच भारतात परतणार..

- मुख्य जलवाहिनी फुटणे

- गळती रोखण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेणे

- समान पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या जोडणे

- वॉल्व्ह बसविण्यासाठी पाणी बंद करणे

- जलवाहिनीला मीटर बसविणे

‘‘स्थापत्य आणि विद्युत विषयक कामासाठी, जलवाहिनी दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवावे लागते. पण संपूर्ण शहराचा एकाच वेळी पाणी पुरवठा बंद केला जात नाही. तर त्यासाठी योग्य नियोजन करून दोन ते तीन टप्प्यात शहराच्या विविध भागात कामे केली जातात.

समान पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी पाणी बंद करावे लागत असले. ठराविक भागापुरते पाणी बंद केल्याने नागरिकांना होणारा त्रासही कमी असतो, त्यांच्या जास्त तक्रारी येत नाहीत. यामध्ये पाणी बंद करून पाणी बचत किंवा पाणी कपातीचा प्रयत्न केला जात नाही.’’

अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

water supply scheme
Mumbai : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम लवकरच सुरु होणार

‘‘महापालिका काही तरी कामासाठी म्हणून सातत्याने एक दिवस पाणी बंद ठेवते, परंतु, त्याचा त्रास पुढचे दोन तीन दिवस होतो. यावर कायमचा उपाय महापालिकेने शोधणे गरजेचे असून, व्यवस्थित पाणी पुरवठा करावी एवढीच आमची अपेक्षा आहे.’’

मनीषा कोपनर, नागरिक

तर तीन टीएमसी पाणी बचत

महापालिकेने वर्षभर आठवड्यातील एक दिवस संपूर्ण शहराचे पाणी बंद ठेवले तर महिन्याला ०.२५ टीएमसी पाण्याचा वापर कमी होतो. या प्रमाणे वर्षाचे ५२ आठवडे पाणी बंद ठेवले तर वर्षभरात ३ टीएमसी पाण्याची बचत होऊ शकते.

म्हणजे खडकवासला धरणाच्या पाणी साठ्याच्या जवळपास दीड पट पाण्याची बचत होते. पण महापालिकेचा असा कोणताही उद्देश नाही, सर्व नागरिकांना पुरेसे पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.