पुणे : कात्रज प्राणीसंग्राहलयातील प्राण्यांसाठी आफ्रिकेतून मागवणार औषधे

Katraj Zoo
Katraj Zoo
Updated on

पुणे: कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्राहलय आणि उद्यानातील आजारी असलेल्या प्राण्यांच्या निदानासाठी आणि उपचारासाठी त्यांना भूल देण्याकरिता लागणारे औषध दक्षिण आफ्रिकेहून खरेदी करण्याचा निर्णय पुणे माहपालिकेने घेतला आहे. देशात ही आवश्यक औषधे मिळत नसल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीने दक्षिण आफ्रिकास्थित वन्यजीव फार्मास्युटिकल्सकडून भूल देण्याची (अॅनेस्थेसिया) औषधे खरेदी करण्यास मान्यता दिली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासणे यांनी दिली. (PMC will order drugs from South Africa for the animals in Katraj Zoo)

इंडियन एक्सप्रेसेने दिलेल्या वृत्तानुसार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यासाठी परवानगी मागितली आहे. पुणे महापालिकेने साऊथ आफ्रिकेकडून 1805 डॉलर म्हणजेचे 1.35 लाखां किंमतीच एटोरिफिन हायड्रोक्लोराइड-कॅप्टिवा 98(Etorphine Hydrochloride-Captiva 98), डिप्रिनोरोफिन हायड्रोक्लोराइड-अॅक्टिवॉन(Diprinorphine Hydrochloride-Activon), नलट्रेक्झोन हायड्रोक्लोराईड-ट्राझोनिल(Naltrexone Hydrochloride-Trazonil) ही औषधे आयात करण्यासाठी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून परवानगी मागितली आहे.

Katraj Zoo
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची तरतूद

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 425 वन्य प्राणी आणि 62 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या वेगवेळ्या प्रजाती आहेत. या प्राण्याचे आजाराचे निदान करण्यासाठी, प्रयोगशाळेत चाचणीसाठी, त्यांच्यावर उपचारासीठी आणि एका ठिकाणावरुन दुसर्‍या ठिकाणी हस्तांतरणासाठी किंवा दुसर्‍या प्राणी संग्रहालयात जनावरांच्या देवाण-घेवाण दरम्यान भूल देण्याची आवश्यकता पडते. बहुतेकत प्राणीसंग्रहालयात प्राणी भूल देण्यासाठी झाइलाझिन(Xylazine) आणि केटामाइन (Ketamine)ही औषधे वापरली जातात कारण, बहुतेक प्राण्यांच्या प्रजातीसाठी हे सर्वात प्रभावीपणे काम करते. तसेच, गवा आणि हत्तींवर या औषधांचा अपेक्षित परिणाम होत नाही.

“राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात गवा आणि हत्ती आहेत. “मादक पदार्थ” श्रेणीतील एटोरफिन हायड्रोक्लोराइड सारख्या औषधांचा वापर त्यांना भूल देण्यासाठी केला जातो पण ती उपलब्ध नाही, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. देशात हे औषध उपलब्ध नाही त्यामुळे ते खरेदी करता आले नाही.” अलीकडे प्राणिसंग्रहालयात आजारी असलेल्या गव्यावर उपाचारासाठी आवश्यक असेलेली औषधे

इतर राज्यातून खरेदी केली. हत्ती आणि गव्यांना मर्यादीत प्रमाणात देण्यासाठी लागणारे एटोरिफिन हायड्रोक्लोराइड-कॅप्टिवा 98(Etorphine Hydrochloride-Captiva 98), डिप्रिनोरोफिन हायड्रोक्लोराइड-अॅक्टिवॉन(Diprinorphine Hydrochloride-Activon), नलट्रेक्झोन हायड्रोक्लोराईड-ट्राझोनिल(Naltrexone Hydrochloride-Trazonil) ही औषधे खरेदी करणे आवश्यक आहे. देशात ही औषधे उपलब्ध नाहीत आणि औषधांचा पुरवठा साऊथ आफ्रिकेतील एक कंपनी करु शकते असे डेहारादून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्युटने कळविल्याची माहिती कुमार यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले कीस,पीएमसीने त्या कंपनीशी संपर्क साधला असून औषध आयात करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली आहे.

Katraj Zoo
77 वर्षांचे 'रायडर' आजोबा; स्कुटीवरुन पालथा घातला देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()