PMP Bus Tourism : आता मनसोत करा पर्यटन सफर! पर्यटनासह धार्मिक स्थळांवर येणार जाता

पीएमपी प्रशासनाने पर्यटकांना कमी दरात धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर करता यावी, यासाठी सात पर्यटन बसची सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे.
PMP Bus
PMP Bussakal
Updated on

पुणे - पीएमपी प्रशासनाने पर्यटकांना कमी दरात धार्मिक व पर्यटन स्थळांची सफर करता यावी, यासाठी सात पर्यटन बसची सेवा पुन्हा एकदा सुरू केली आहे. मागच्या वर्षी १ मे रोजी ही सेवा सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने या सेवेला काही अंशी ब्रेक लागला होता. आता पुन्हा पर्यटन बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना पुण्याच्या जवळच्या प्रसिद्ध भागांना भेटी देता येतील.

या धार्मिकस्थळांना जाता येणार : महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा जेजुरी व अष्टविनायक पैकी मयूरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर), महागणपती (रांजणगाव),सासवड येथील सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर येथील एकमुखी दत्त मंदिर, बालाजी मंदिर (केतकावळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर,वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विविध धार्मिक स्थळांचा समावेश आहे.

कधी : दर शनिवारी, रविवारी तसेच शासकीय सुट्टी असेल तेव्हा या बस धावतील. बस पूर्णपणे वातानुकूलित असतील.

या पर्यटनस्थळांना जात येणार : टेमघर धरण, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगाव धरण, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर.

पर्यटन बससेवा क्र. १

मार्ग : हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसर.

बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

बस पोहोचण्याची वेळ : दुपारी ४

बसचा पहिला व शेवटचा थांबा : हडपसर गाडीतळ

तिकीट दर : प्रतिप्रवासी ५०० रुपये

क्र. २

मार्ग : हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर.

बस सुटण्याची वेळ : सकाळी ०९:००

बस पोहोचण्याची वेळ : सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी

बसचा पहिला व शेवटचा थांबा : हडपसर गाडीतळ

तिकीट दर : प्रतिप्रवासी ५०० रुपये

क्र. ३

मार्ग : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन.

बस सुटण्याची वेळ : सकाळी ९ वाजता

बस पोहोचण्याची वेळ : दुपारी ५ वाजता

बसचा पहिला व शेवटचा थांबा : डेक्कन जिमखाना

तिकीट दर : प्रतिप्रवासी ५०० रुपये

क्र. ४

मार्ग : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगाव धरण, पुणे स्टेशन.

बस सुटण्याची वेळ : सकाळी ९

बस पोहोचण्याची वेळ : दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी

बसचा पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन बसस्थानक

तिकीट दर : प्रतिप्रवासी ५०० रुपये

क्र. ५

मार्ग : पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे रेल्वेस्थानक.

बस सुटण्याची वेळ : सकाळी ९ वाजता

बस पोहोचण्याची वेळ : सायंकाळी साडे पाच वाजता

बसचा पहिला व शेवटचा थांबा : पुणे स्टेशन बसस्थानक

तिकीट दर : प्रतिप्रवासी ५०० रुपये

क्र. ६

मार्ग : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजी महाराज समाधिमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती, पुणे रेल्वेस्थानक.

बस सुटण्याची वेळ : सकाळी ९ वाजता

बस पोहोचण्याची वेळ : दुपारी साडे पाच वाजता

बसचा पहिला व शेवटचा थांबा : पुणे रेल्वे बसस्थानक

तिकीट दर : प्रतिप्रवासी ५०० रुपये

क्र. ७

मार्ग : भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगाव), देहूगाव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी.

बस सुटण्याची वेळ : सकाळी ९

बस पोहोचण्याची वेळ : सायंकाळी ६ वाजून २०

बसचा पहिला व शेवटचा थांबा : निगडी भक्ती शक्ती बसस्थानक

तिकीट दर : प्रतिप्रवासी ५०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.