पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड बाहेरून दोन्ही शहरात ये-जा करणा-या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) ग्रामीण भागातील सेवा पुन्हा सुरू केली आहे. यानुसार 12 डिसेंबरपासून 12 मार्ग सुरू करण्यात येणार असून यामध्ये चाकण, रांजणगाव, जेजुरी एमआयडीसी, यवत, सारोळा आदी भागांचा समावेश आहे. या मार्गांवर एकूण 70 बसेस सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सेवा दिली जाते. यासाठी प्रशासनाकडे मालकीच्या आणि भाडेतत्वावरील मिळून दोन हजार पेक्षा अधिक बसेस आहेत. पीएमपीची कोरोनापुर्वी प्रमाणे सेवा सुरू नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात सेवा विस्तार करण्यास प्रशासनाने पावले उचलली आहेत. विशेषतः चाकण एमआयडीसी, सासवड, जेजुरी एमआयडीसी या औद्योगिक भागात प्रवाशांची संख्या अधिक आहे.
या प्रवाशांना बसेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. यासाठी संबंधित भागातील नोकरदार, शाळा, महाविद्यालयाकडून मागणी होत होती. तसेच, पीएमआरडीएच्या हद्दीपर्यंत बससेवा सुरू करण्यास पीएमपीएलच्या संचालक मंडळाने देखील मान्यता दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामीण भागातील 12 मार्गांवर सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.
नवे मार्ग | बस संख्या | वारंवारिता |
कात्रज - सारोळा | 6 | 30 मिनिटे |
हडपसर - यवत | 6 | 40 मिनिटे |
डेक्कन-भूगाव | 6 | 25 मिनिटे |
वाघोली - राहू | 4 | 1 तास |
वाघोली - रांजणगाव | 10 | 30 मिनिटे |
हडपसर - फुरसुंगी - हडपसर (वर्तुळ) | 2 | 30 मिनिटे |
हडपसर - घोरपडी | 6 | 15 मिनिटे |
सासवड - जेजुरी एमआयडीसी | 6 | 20 मिनिटे |
चाकण - तळेगाव दाभाडे | 8 | 20 मिनिटे |
पिंपरी रोड - स्पाईन मॉल | 2 | 30 मिनिटे |
पिंपरी रोड - वारजे माळवाडी | 6 | 35 मिनिटे |
चाकण - शिक्रापूर | 8 | 20 मिनिटे |
एकूण - 70 बसेस
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.