अग्निशमन दलाच्या नीलेश लोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस इलेक्ट्रॉनिक असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता असू शकते. नेमके कारण स्पष्ट नाही.
घोरपडी : पुणे- सोलापूर रस्त्यावरील काळू बाई चौकाजवळ ९३ अव्हेन्यू माॅलसमोर आज सायंकाळी साडे सातच्या सुमारास पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रॉनिक बसला आग (PMPML Electric Bus Fire) लागल्याची घटना घडली. सुदैवाने सर्व प्रवाशांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली.