पुणे : PMPMLकडून कात्रज-सासवड बससेवेचा मुहुर्त

कात्रज ते विंझर बसमार्गाचाही वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत विस्तार
PMPML
PMPMLSakal
Updated on

कात्रज : 'पीएमपी'कडून कात्रज ते विंझर (मार्ग क्रमांक २९६) या बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत करण्यात आला आहे. तसेच कात्रज ते गराडे मार्गे सासवड (मार्ग क्रमांक २०९ ब) हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते कात्रज सर्पोद्यान स्थानक येथे या दोन्ही बससेवांचा शुभारंभ करण्यात आला. (Katraj Saswad Bus Service Start PMPML)

यावेळी नगरसेवक प्रकाश कदम, राजेंद्र शिळीमकर, नगरसेवक, दत्तात्रेय धनकवडे, नगरसेविका अमृता बाबर, राणी भोसले, वर्षा तापकीर, स्मिता कोंढरे, पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे, कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे, शैलेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. कात्रज ते वेल्हे या बससेवेसाठी नगरसेविका राणी भोसले यांनी तर कात्रज ते सासवड या बससेवेसाठी पुरंदर तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

PMPML
मुहुर्त : पुणे ते तोरणा गडाच्या पायथ्याशी PMPML ची सेवा सुरू

कात्रज ते वेल्हे-किल्ले तोरणा या बससेवेचा मार्ग कात्रज, खेड शिवापूर, नसरापूर, आंबवणे, विंझर, वेल्हे-किल्ले तोरणा असा असणार आहे. सध्या या मार्गावर ५ बसेसद्वारे साधारणपणे दर एका तासाने दिवसभरात एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत. कात्रज ते वेल्हे पहिली बस सकाळी ५.५०ला तर शेवटची बस रात्री ८.४५ला आहे. तसेच वेल्हे ते कात्रज पहिली बस सकाळी ६ला तर शेवटची बस रात्री ९ला आहे.

कात्रज ते सासवड या बससेवेचा मार्ग कात्रज, येवलेवाडी, बोपदेव घाट, भिवरी, गराडे, कोडीत, सासवड असा असणार आहे. सध्या या मार्गावर १ बसद्वारे साधारणपणे अडीच तासाने दिवसभरात एकूण १२ फेऱ्या होणार आहेत. कात्रज ते सासवड पहिली बस सकाळी ६.०५ला तर शेवटची बस रात्री ८.२०ला आहे. तसेच सासवड ते कात्रज पहिली बस सकाळी ७.२५ला तर शेवटची बस रात्री ९.३५ला आहे.

यावेळी बोलताना महापौर मोहोळ म्हणाले, गेल्या एक ते सव्वा वर्षात शहराला लागून असलेल्या तालुक्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी ३५ नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले. यामुळे नवीन बसमार्गांवरील ३५० ते ४०० गावे पुणे शहराला जोडली गेली आहेत. आमदार तापकीर म्हणाले, वेल्हेपर्यंत बससेवा सुरू झाल्याने पर्यटनाला चालना मिळेल. यावेळी अन्य मान्यवरांनीही मनोगते व्यक्त केल्याने राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()