पुणे : भारती विद्यापीठ बसथांबा अंधारात; प्रवाशांचे हाल

तीन महिन्यांपासून दिवे बंद; अंधारात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता
PMT Bus Stop
PMT Bus StopSakal
Updated on

कात्रज : सातारा रस्त्यावरील पीएमपीएलच्या (PMPML) भारती विद्यापीठ (Bharti University) बसथांब्यातील दिवे तीन महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दिवे नसल्यामुळे प्रवाशांना अंधारात बसची वाट बघत उभे राहावे लागते. येथील स्थानकांवरून अनेक महिला तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थींनी (Student) प्रवास करतात. रात्रीच्या वेळी दिवे बंद असल्याने अंधारात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएमपीएल प्रशासनाने तातडीने दिवे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

काही महिन्यापूर्वीच पीएमपीएलने सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्ग सुरू केला. लाखो रूपयांचा खर्च करून बसथांबे उभारण्यात आले आहेत. त्यानंतर काही महिन्यांतच बसथांब्यावरील विजेचे दिवे बंद पडले आहेत. तसेच दरवाजेही तुटले असून घाणीचेही साम्राज्य पसरले दिसत असून कात्रज-स्वारगेट बीआरटी मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बस थांब्यावरील सुरक्षा कर्मचारी गायब आहेत. त्याचबरोबर, १९ ऑगस्ट २०२१ पासून स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावरील सर्वच बसथांब्यावरील दिवे बंद होते. महिनाभरानंतर दिवे सुरू करण्यात आले. पण, अद्यापही भारती विद्यापीठ बसथांब्यावर दिवे बंद आहेत.

PMT Bus Stop
यवतमाळ : चोरट्यांचा पारा भडकला अन् साहित्याची केली नासधूस

तक्रारींना महापालिकेकडून केराची टोपली

प्रवाशांकडून केलेल्या तक्रारींना महापालिकेकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचे दिसून येते. सातारा रस्त्यावरील अन्य बसथांब्यावरील दिवे अंधार पडल्यानंतरही वेळेवर सुरू करण्यात येत नाहीत अशी प्रवाशांची तक्रार आहे. महापालिकेच्या तक्रार संपर्क क्रमांकावर आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या अडचणींबाबत तक्रार दाखल करूनही उपयोग होत नसून दखल घेतली जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

कात्रज आगारापासून हाकेच्या अंतरावरील भारती विद्यापीठ हा बसथांबा असून सुध्दा पीएमपीएलकडून अद्यापही काहीच उपाययोजना करण्यात येत नाहीत. प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. प्रवासी सुरक्षिततेला पीएमपीएल प्रशासन प्राधान्य देत नाही. अंधारामुळे अनुचित घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? हा खरा प्रश्न आहे.

- आदित्य गायकवाड, प्रवासी

दोनवेळा हे दिवे दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु, येथिल विजवाहूनी भूमिगत असल्याने अडचण निर्माण होत आहे. परंतु, पुढील आठवड्यात या ठिकाणी पुन्हा कामाला सुरुवात होणार असून लवकरच प्रवाशांची अडचण दूर होईल.

- सतीश गव्हाणे, बिआरटी व्यवस्थापक, पीएमपीएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.