पुणे - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांमधील (Children) संसर्गाचा धोका (Danger) कमी व्हावा, या उद्देशाने एक वर्ष वयाच्या आतील सर्व बालकांना न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) (PVC) ही न्यूमोनिया प्रतिबंधक लस (Pneumonia Vaccine) दिली जाणार आहे. दीड महिन्याच्या बाळापासून नऊ महिन्यापर्यंतच्या सर्व बालकांना ही लस (Vaccine) दिली जाणार आहे. यानुसार दीड महिने वयाच्या सर्व बाळांना या लसीचा पहिला डोस, साडेतीन महिन्यानंतर दुसरा डोस आणि वयाची नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर तिसरा डोस दिला जाणार आहे. (Pneumonia Vaccine Given One and Half Month Old Children)
पुणे शहर व जिल्ह्यात आजपासून (ता. १३) या लसीकरणास सुरवात झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये तर, ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेअंतर्गत वर्षभरात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील सर्व बालकांचे लसीकरण केले जाणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातच दोन वर्षे वयाच्या आतील बालकांना न्यूमोनिया हा आजार होण्याचा जास्त धोका असतो. शिवाय कोरोना हा न्युमोनियासदृश आजार असल्याने बालकांमध्ये खरंच कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल, असे गृहित धरण्यात आले आहे.
बालकांना गोवर, रुबेला, काविळ, टायफॉईड, हेपेटाईटीस बी यासारख्या आजारांचा धोका असतो. या आजारांपासून संरक्षण देण्यासाठी त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्व बालकांना राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत या आजार प्रतिबंधासाठीच्या लसी दिल्या जातात. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे बालकांना न्यूमोनिया झाल्यास, त्यापासून पुढे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे बालकांना न्यूमोनियाच होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
पावणेदोन लाख बालकांना लाभ
पुणे व पिंपरी चिंचवड शहर, १४ नगरपालिका, तीन कटक मंडळे आणि एक हजार ३८५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मिळून सद्यःस्थितीत दीड ते नऊ महिन्यांपर्यंत वय असलेली १ लाख ७३ हजार ३३४ बालके आहेत. या सर्व बालकांचे लसीकरण येत्या वर्षभरात मोफत लसीकरण केले जाणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या लसीची किंमत प्रत्येकी पाच हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये आपापल्या बाळांचे मोफत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.