Wagholi News : पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये महिला पालकांचे ठिय्या आंदोलन

पालकांचे शुल्क परस्पर स्वतःच्या खात्यात घेवून फसवणूक.
podar international school
podar international schoolsakal
Updated on

वाघोली - वाघोली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या अकाऊंटटने पाच महिन्यांपूर्वी पालकांचे शुल्क परस्पर स्वतःच्या खात्यात घेवून फसवणूक केली. त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मात्र तरीही स्कूल पुन्हा पालकांकडे शुल्क मागत असल्याने आज काही महिला पालकांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले. सुमारे दोन तास पालक व स्कूल प्रशासन यांच्यात वाद सुरू होता. पोलीसांनाही तेथे दखल घ्यावी लागली.

येथील या स्कूल मध्ये विनय भेडरकर हा अकाऊटंट म्हणून काम करीत होता. त्याने स्कूल शुल्क स्वतःच्या खात्यात तसेच रोकड म्हणून घेतले. परंतु त्याने ते शुल्क शाळेला जमा केले नाही. काही दिवसानंतर त्याने लाखो रुपये लाटल्याचे स्कूलच्या लक्षात आले. तो पर्यंत तो फरार झाला होता. त्यानंतर स्कूलने त्याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

ज्या पालकांनी त्यांचे शुल्क त्याच्याकडे जमा केले. त्यांचे शुल्क बाकी दिसत असल्याने त्यांनी शुल्क साठी पालकांना तगादा लावला. पालकांनी याबाबत स्कूल प्रशासनाला भेटण्याच्या प्रयत्न केला. मात्र स्कूल प्रशासनाने त्यांची दाखल घेतली नाही. आज हे पालक काँग्रेसच्या सीमा गुट्टे यांना घेवून शाळेत आल्या. त्यांनी स्कूल प्रशासनाला सर्व बाब समजून सांगितली. मात्र आम्ही तुमच्या मुलांना शाळेत येण्यासाठी अडवले नाही.

शुल्कचा विषय नंतर बघू असे सांगून त्यांना परत पाठविण्याचा प्रयत्न करीत होते. स्कूल प्रशासन पालकांशी अत्यंत रूढ भाषेत बोलत होते. मात्र पालकांनी जो काय निर्णय घ्यायचा तो आताच घ्या असे सांगत शाळेतच ठिय्या मांडला. त्यांच्यातील वाद संपत नव्हता. अखेर पालक खूपच संतापल्याने प्रशासन नरमले.

त्यांची नावे घेवून यातून मार्ग काढू असे आश्वासन दिले. फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ७० असल्याचे पालकांनी सांगितले. अखेर पोलीसांना ही बाब कळाली. सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले हे चार कर्मचाऱ्यासह तेथे दाखल झाले. त्यांनी पालक व प्रशासन यांच्याशी चर्चा केली. दरम्यान फसवणूक झालेले पालक पोलीसांना जबाब लिहून देणार आहेत.

ते स्कूलचे अकांऊटंट होते. म्हणून आम्ही त्यांच्याकडे शुल्क जमा केले. फसवणूक होईल असे वाटले नव्हते. परंतु आमची फसवणूक होवूनही आमच्याकडे स्कूलने शुल्क साठी तगादा लावला होता. म्हणून आम्हाला हे आंदोलन करावे लागले.

- एक महिला पालक

ज्या पालकांची ही समस्या आहे. त्यांच्या बाबत स्कूल व्यवस्थापनाला माहिती देवू. ते याबाबत योग्य निर्णय घेतील. या पालकांच्या मुलांना आम्ही शाळेत येण्यास अडविलेले नाही.

- मुनीष शर्मा. मुख्याध्यापक, पोदार इंटरनॅशनल स्कूल.

पालकांच्या तक्रारी

* पालकांना कार्यालयात येवू देत नाही

* स्कूल प्रशासनाशी बोलू देत नाही

* स्कूल प्रशासन काहीही एकूण घेत नाही

* पालकांनाच अरेरावीची भाषा करतात.

* मुलांचे रिपोर्ट कार्ड अद्याप दिले नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.