Baba Siddique Murder Case: कोण आहेत मोनू अन् गुल्लू? बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखी दोघांना अटक

Baba Siddique Bishnoi Gang: माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील वारजेतून दोघांना अटक करण्यात आली आहे.
Law enforcement officers detaining two individuals linked to the Baba Siddique murder case in Warje, Pune
Police arrest two suspects in the Baba Siddique murder case in Warje, Pune.Esakal
Updated on

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील वारजेतून दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेल्या दोघांचा हत्या प्रकरणात कशा प्रकारचा सहभाग आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अटक केलेल्या दोघांची नावे मोनू आणि गुल्लू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी आधीच तिघांना अटक केली आहे. शनिवारी रात्री मुंबईत सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

घटनेनंतर लगेचच मुंबई पोलिसांनी गुरमेल सिंग आणि धरमराज कश्यप या दोन शूटर्सना अटक केली, तर अन्य दोन आरोपी फरार आहेत. या कटात सहभागी असलेल्या आणखी एका आरोपीला रविवारी पुण्यातून अटक करण्यात आली होती.

दरम्यान आज वारजेतून अटक करण्यात आलेले मोनू आणि गुल्लू सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींच्या सोबत राहत होते. अशी माहिती समोर आली आहे. पोलीस आता या दोघांचा हत्येमध्ये काही सहभाग आहे की नाही, याचा तपास पोलीस करणार आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सिद्दीकींच्या हत्येच्या तपासादरम्यान पुण्यातील प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांची कथित भूमिका उघड केली. फरार आरोपींना अटक केल्यानंतरच या हत्येमागील हेतू स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या गुन्ह्यात पोलिसांनी लोणकर बंधूंना मुख्य आरोपी मानले आहे. दोघांनी हल्लेखोरांना पैसे पुरवल्याचा आणि हल्ल्यापूर्वी बैठका घेतल्याचा आरोप आहे.

Law enforcement officers detaining two individuals linked to the Baba Siddique murder case in Warje, Pune
Nashik Assembly Election : पोलिस आयुक्तालयात विधानसभा कक्ष कार्यान्वित! आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईतांची माहिती संकलित

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा शुभू लोणकरचा भाऊ असून त्याने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी घेतल्याचे पोस्ट केले होते.

शुभू लोणकर हा सध्या फरार आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना प्रवीण लोणकर याने पुण्यात आश्रय दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीक यांची शनिवारी निर्मल नगर येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी गोळीबारामुळे अनेक जखमा झाल्या होत्या, तेथे शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

Law enforcement officers detaining two individuals linked to the Baba Siddique murder case in Warje, Pune
Baba Siddique Murder: सिद्दीकी हत्या कटाचं काय आहे पुणे कनेक्शन, जाणून घ्या आतली बातमी एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.