शेळ्या बकऱ्यांचा व्यवसाय करण्याकरिता घेतलेले ३ लाख रुपये कर्ज ४० टक्के प्रतिमहिना वसूल करून वर्षभरात १७ लाख रुपये वसूल केले.
लोणी काळभोर - शेळ्या बकऱ्यांचा व्यवसाय (Business) करण्याकरिता घेतलेले ३ लाख रुपये कर्ज (Loan) ४० टक्के प्रतिमहिना वसूल (Recovery) करून वर्षभरात १७ लाख रुपये वसूल करणाऱ्या सावकारास (Monelenders) गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी जेरबंद (Arrested) केले आहे.
शरीफ जमादार व अरशान मनियार (रा. वडकी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या सावकरांची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीने शेळया व बक-यांचा व्यवसाय करण्याकरिता शरीफ जमादार व अरशान मनियार यांच्याकडून तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज व हे शरीफ जमादार व अरशान मनियार यांनी ४० टक्के प्रति महिना दराने दिले. तरीही सदर आरोपींनी वर्षभरामध्ये व्याजापोटी एकूण सतरा लाख रुपये वसूल केले.
तसेच पतीकडून सदरचे पैसे हे हातउसणे घेतलेबाबत नोटराईज अॅग्रीमेंट केले होते. तरीही कर्ज तारण म्हणून राहते घर नोटराईज अॅग्रीमेंट करून घेतले आहे. शरीफ जमादार व अरशान मनियार यांनी तक्रारदार यांच्या पतींकडे व्याजाची रक्कम देण्याकरिता तगादा लावल्याने ते त्यांच्या त्रासाला कंटाळून घर सोडून निघून गेले.
दरम्यान, त्यांनी तक्रारदार महिलेकडे देखील व्याजाच्या पैशांकरिता तगादा लावला व पैसे न दिल्यास घर खाली करून घराचा ताबा देण्याकरिता शिवीगाळ करून धमकविल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, युनिट ६ हे करित आहे.
सदरची कामगिरी युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.