पोलीस पतीचा वरवंड येथे अपघातात मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी

घरात घुसलेला टेम्पो
घरात घुसलेला टेम्पो
Updated on

वरवंड - पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने दुचाकी वरून गावी निघालेल्या पोलीस व त्याच्या पत्नीचा वरवंड (ता. दौंड) येथे सायंकाळी साडे सात वाजता अपघात झाला.यामध्ये पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोने दुभाजकावरून विरुद्ध दिशेला अलीकडे येऊन दुचाकीला धडक दिली. नंतर टेम्पो रस्त्यापासून काही अंतरावर असणाऱ्या घरात घुसला. यात घराची भिंत कोसळली.सुदैवाने यात कोणतीच जीवित हानी झाली नाही.

शंकर नाना डोईजड (वय 43) असे मयत झालेल्या पोलिसाचे नाव आहे.तर पत्नी संगीता शंकर डोईजड (वय 35) दोघेही रा. दौंड जि. पुणे या गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी माहिती दिली.शंकर व त्यांची पत्नी शुक्रवारी (ता. ४) दुचाकी वरून महामार्गाने गावी दौंड येथे चालले होते.वरवंड हद्दीत कौठीचामळा भागात सायंकाळी साडे सात वाजता पुण्याकडे जाणाऱ्या एका टेम्पोने दुभाजकावरून विरुद्ध दिशेला येऊन  शंकर यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की शंकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी संगीता गंभीर जखमी झाल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टेम्पो या या दोघांना धडक देऊन थेट काही अंतरावर असणाऱ्या घरात शिरला. या धडकेत घराचे मोठे नुकसान झाले. घराची पडझड झाली. यावेळी घरात लहान मुले व इतर व्यक्ती बसले होते. सुदैवाने त्यांच्या अगदी काही फुटावर भिंत कोसळून टेम्पो उभा राहिला.

या अपघात नंतर वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी घाव घेतली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी संगीता यांना तात्काळ उपचारासाठी चौफुला येथील खासगी रुग्णालयात पाठविले. 

त्यानंतर पाटस व महामार्ग पोलिसांनी हजेरी लावली. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. यावेळीं मयत शंकर यांच्या खिशात पोलीसाचे ओळखपत्र आढळून आले.यावरून ते पुणे शहरात पोलीस असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी डायरीतील नंबर वरून नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.

शंकर हे सुट्टी घेऊन पत्नी समवेत गावी चालले होतें. पण त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघात ठिकाणी रक्ताचे सडे, मुलांसाठी बिस्किटपुडे, चॉकलेट पडले होतें. हे पाहून अनेकांच्या भावना अनावर झाल्या. 

दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी टेम्पो चालकास पकडून ठेवले. चालकाने प्रचंड मद्य प्राशन केले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, पोलीस नाईक संतोष मदने, घनश्याम चव्हाण, महामार्ग पोलीस यांनी चालकास ताब्यात घेतले. तसेच मयत शंकर यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिला. रात्री उशिरा पर्यंत पंचनामा व इतर कार्यवाही सुरू होती.

दरम्यान,महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. यावेळी दुभाजकाची उंची न वाढविल्याने किंबहुना योग्य नियोजन व केल्याने या चार दिवसात हा दुसरा अपघात असल्याचे वैभव दिवेकर व इतर नागरिकांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.