बारामतीत महात्मा फुले तलावाजवळ एकाच वेळी 'इतकी' गंजलेली पिस्तूल सापडल्याने खळबळ; पोलिसांकडून सखोल तपास सुरू

गेल्या काही वर्षांत बारामती शहरांमध्ये पोलिसांनी अनेक युवकांकडून बेकायदा गावठी कट्टे व पिस्तूल जप्त केलेले आहेत.
Baramati City Police
Baramati City Policeesakal
Updated on
Summary

मध्य प्रदेशामधून अतिशय कमी किमतीमध्ये सहजतेने ही शस्त्रे मिळत असल्याची पोलिसांची माहिती आहे. काही एजंट या परिसरात येऊन पिस्तुलांची विक्री देखील करतात.

बारामती : शहरातील महात्मा फुले साठवण तलावानजीक पाच गंजलेल्या अवस्थेतील पिस्तूल (Pistol) सापडल्याने बारामतीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने साठवण तलावानजीक पाच पिस्तुले टाकून दिली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

बारामती शहर पोलीस (Baramati City Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी असलेली गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तुले ताब्यात घेतली आहेत. ही पिस्तुले नेमकी कोणी या ठिकाणी आणून टाकली व ही कोणाच्या मालकीची आहेत, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, बारामतीसारख्या शांतताप्रिय शहरामध्ये अचानक एकाच वेळेस पाच पिस्तुले सापडण्याची ही घटना चिंताजनक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Baramati City Police
Chakan Crime : चाकण-तळेगाव मार्गावर 'या' सराईत गुंडाचा खून; डोक्यात कोयत्याने सपासप वार, दोघे आरोपी फरार

गेल्या काही वर्षांत बारामती शहरांमध्ये पोलिसांनी अनेक युवकांकडून बेकायदा गावठी कट्टे व पिस्तूल जप्त केलेले आहेत. मध्य प्रदेशामधून अतिशय कमी किमतीमध्ये सहजतेने ही शस्त्रे मिळत असल्याची पोलिसांची माहिती आहे. काही एजंट या परिसरात येऊन पिस्तुलांची विक्री देखील करतात, अशी माहिती पोलिसांकडे असून त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे.

गोपनीय बातमीदारांमार्फत शस्त्रे बाळगण्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र, एकाच वेळेस गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तुले कोणी या ठिकाणी आणून टाकून दिली असतील, या दृष्टीने पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केला आहे. या घटनेला पोलीस विभागाने गांभीर्याने घेतले असून त्याचा सखोल तपास सुरू केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.